• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, August 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

गनिमी कावा, रस्ता अडवलेली वाहने रातोरात पोहोचली झेडपीच्या गेटवर,त्यावर लिहिले..

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 13, 2026
in Arambh Marathi Special
0
गनिमी कावा, रस्ता अडवलेली वाहने रातोरात पोहोचली झेडपीच्या गेटवर,त्यावर लिहिले..
0
SHARES
771
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

सह्याद्री कॉर्नर–पंचायत समिती मार्गावरील अडथळा हटवला; रस्त्यामुळे नागरिकांची होत होती कोंडी, वारंवार सांगूनही आणला जात होता रस्त्यावर अडथळा

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सह्याद्री कॉर्नर ते पंचायत समिती मार्ग तब्बल तीन आठवडे बंद ठेवल्यानंतर रविवारी रातोरात गनिमीकावा करत या मार्गावरील अडथळा हटविण्यात आला. रस्ता रोखण्यासाठी उभी करण्यात आलेली दोन्ही नादुरुस्त वाहने अज्ञात व्यक्तींकडून थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणून उभी करण्यात आल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले.

त्यामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.
विशेष म्हणजे या वाहनांवर असावा एक छंद ‘सत्तेच्या अहंकाराचा, नागरिकांचा रस्ता अडवण्याचा, नागरिकांची गैरसोय करण्याचा…’ अशा ओळी लिहून जिल्हा परिषदेसमोरील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, जिल्हा परिषदेने हा रस्ता वापरू नये. सौजन्य – नागरिक धाराशिव. अशा प्रकारची सूचना लिहिण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाकडे आरंभ मराठीने सातत्याने लक्ष वेधले होते. सह्याद्री कॉर्नर ते पंचायत समिती हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः समता नगर परिसरातील रहिवाशांना तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बसस्थानक, विविध बँका तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. परिणामी वाहतूक कोंडी, इंधनाचा अतिरिक्त खर्च आणि वेळेचा अपव्यय होत असल्याबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.


जिल्हा परिषद प्रशासनाने या मार्गाच्या प्रवेशद्वारावर दोन नादुरुस्त वाहने उभी करून रहदारी रोखल्याने हा वाद अधिकच चिघळला होता. नगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे अडथळा निर्माण केल्याबद्दल विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यापूर्वीही सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच मार्गावर जिल्हा परिषद प्रशासनाने तारेचे कुंपण उभारून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत कुंपण हटवले होते. मात्र त्यानंतर पुन्हा दोन नादुरुस्त वाहने उभी करून हा मार्ग बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने नगरोत्थान महाभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेच्या हद्दीतील ५९ रस्त्यांच्या विकासासाठी १४० कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात क्रमांक २५ वर सह्याद्री कॉर्नर ते पंचायत समिती या २५० मीटर लांबीच्या आणि ९ मीटर रुंदीच्या रस्त्याचा समावेश असून, या कामासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच धाराशिव नगरपालिकेने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेशही काढला आहे.

विकासासाठी निधी मंजूर झालेला आणि कार्यारंभ आदेश मिळालेला सार्वजनिक रस्ताच प्रत्यक्षात बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत होता. आता गनिमी कावा करत रस्ता अडवणारी वाहने हटवून ती जिल्हा परिषदेच्या गेटवर उभी करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. रातोरात हा गनिमी कावा नेमका कोणी केला याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

SendShareTweet
Previous Post

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

Next Post

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

Related Posts

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

June 21, 2026

आलूर मतदान केंद्रावर पत्रकारांना दमदाटी; पीएसआय संदीप दहिफळे यांचा जाहीर निषेध

February 7, 2026

शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; धाराशिवच्या ‘या’ पतसंस्थेने केली पहिली मदत, मुख्यमंत्री सहायता निधींचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार

September 24, 2025

बाप्पा, विकासाच्या मारेकऱ्यांना सद्बुद्धी दे, तुझ्या उत्सवातली वेदना आम्हालाही सहन होत नाही..

August 27, 2025

प्रवीण गुरुजी, निकले फर्जी..?, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींवर ॲड. शीतल चव्हाण यांचा हल्लाबोल, थिल्लरपणा बंद करा!

July 27, 2025

इथे विद्यार्थ्यांनाही भोग भोगावे लागतात, नूतन प्राथमिक शाळाच पाण्यात!, धाराशिवचे प्रशासन झोपलेय का?

July 26, 2025
Next Post
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

ताज्या घडामोडी

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group