• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, January 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कहाणी जिद्दीची; ७७ वर्षांच्या जलतरणपटू!

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 14, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
87
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter
  • भाग्यश्री मुळे, नाशिक,

  • नाशिकच्या जयंतीबाई काळे अर्थात काळे आजी. साडी, डोक्यावर पदर, ठसठशीत कुंकू, वय ७७. पण उत्साह मात्र १६ वर्षाच्या मुलीला लाजवेल असा. काळे आजी या मूळच्या दिंडोरीच्या. त्यांचे वडील एक्साइज खात्यात डीवायएसपी. त्यामुळे वरचेवर बदल्या ठरलेल्या. तर आई शिक्षिका. चार बहिणी, चार भाऊ, आई वडील असे जयंती बाईंचे दहा जणांचे कुटुंब. दुसरीत असल्यापासून जयंती यांना पोहण्याची आवड निर्माण झाली.
  • अहमदनगरला असताना शाळेत जाताना वाटेत लागणारी नदी पोहून पार करायची असा त्यांचा शिरस्ता. त्यातून पाण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मैत्रिणींबरोबर त्या मधल्या सुटीतही पोहायला जाऊ लागल्या. मोठ्यांचं बघून बघूनच त्या तेव्हा पोहायला शिकल्या. गावकऱ्यांनी मात्र त्यांच्या वडलांकडे जयंतीच्या पोहण्याविषयी तक्रार केली. त्यामुळे वडलांच्या हातचा मार खावा लागला. किती मारलं तरी जयंतीची पाण्याची ओढ कमी व्हायची नाही. नंतर वडलांची मालेगावला बदली झाली. तिथंही शाळा संपल्यावर गिरणा नदी त्यांना खुणवायची. भुसावळला असताना तिथंही तापी नदी होतीच. पोहण्याबरोबरच त्यांना सायकलिंगची देखील आवड होती. ६५ साली वसईच्या चिमाजी अप्पा किल्ला परिसरातील खाडीत देखील त्या पोहल्या. पोहण्याविषयी शिक्षक, त्या त्या गावच्या लोकांच्या तक्रारी येतच होत्या. आपली मुलगी काही ऐकत नाही म्हटल्यावर वडलांनी लेकीचं नववीत असतानाच म्हणजे ६६ साली लग्न लावून दिलं.

  • जयंतीबाईंचे पतीही एक्साइज खात्यात इन्स्पेक्टर होते. एकदा नव्या सुनेला सासूबाई शेत दाखवायला घेऊन गेल्या. तिथं शेतात विहीर पाहून जयंतीबाई खुश झाल्या. विहिरीत थेट उडी घेऊन त्यांनी पोहायला सुरवात केली. आपल्या सुनेला पोहता येतं याची काहीच कल्पना नसल्याने त्यांच्या सासूबाई घाबरून रडायला लागल्या. नंतर जयंतीबाई वर आल्या. मला पोहता येतं म्हणून मीच उडी मारली असं सांगितल्यावर त्या शांत झाल्या. अर्थात इथून पुढे असं काही करू नको असं बजावण्यास त्या विसरल्या नाहीत. नाशिकला बदली झाल्यावर पाणीटंचाईमुळे धुणी-भांडी करण्यासाठी गंगेवर, नासर्डी नदीवर जावं लागायचे. जयंतीबाई कामं झाली की तिथंही आपली पोहायची हौस भागवायच्या.

  • जयंतीबाईंच्या या आवडीला अर्धविराम मिळाला तो मात्र मुलांच्या जन्मानंतर. तीन मुलं, दोन मुली, पती, सासूसासरे आणि दीर, नणंदा अशा भरल्या घरात साऱ्यांचं करता करता त्यांना दिवस पुरेनासा झाला. अर्थात आवड माणसाला शांत बसू देत नाही. तसंच झालं. मुलं थोडी मोठी झाली. जबाबदाऱ्या कमी झाल्या. मग मात्र जयंतीबाईंनी मुलाच्या मागे लागून वीर सावरकर जलतरण तलावात रीतसर प्रवेश घेतला. आता नियमित पोहणं सुरू झालं. या गोष्टीलाही आता ३० वर्ष होत आली.

  • जयंतीबाईंचं पोहण्यातील कौशल्य पाहून तेथील प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी त्यांना ज्येष्ठांसाठी असणाऱ्या जलतरण स्पर्धेविषयी सांगितलं. विविध स्पर्धांसाठी त्यांना पाठवलं. आजवर आजी वर्सोवा समुद्रकिनारा, अमरावती, लखनऊ, पुणे, नाशिक, विशाखापट्टणम, जळगाव, नांदेड, गोवा, मालवण अशा विविध ठिकाणच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या आहेत.
  • या सगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी असंख्य पदके जिंकली आहेत.
    आजीनी ५० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर ब्रेस्ट स्टोक, फ्री स्टाईल व मिडले आदी विविध प्रकारात बक्षिसे मिळविली आहेत. या कामगिरीबद्दल त्यांचा नाशिक महानगर पालिका, नाशिक पोलीस दल आणि विविध संस्थांतर्फे सत्कार देखील झाला आहे. पोहण्याने आरोग्य चांगले राहते, शरीर बळकट राहते हे माहित असल्याने घरी मुले, मुली, नातवंड यानाही त्यांनी पोहण्याची गोडी लावली आहे. त्यांचे पती देखील निवृत्तीनंतर काही काळ त्यांच्याबरोबर पोहायला यायचे. आता मात्र आरोग्याच्या काही तक्रारींमुळे ते फारसे घराबाहेर पडत नाही.

  • आजी स्वतःच्या पोहोण्याबद्दल जागरूक असतातच पण तरण तलावावर नव्याने आलेल्या तरुणी, महिला यांना देखील त्या पोहण्यास मदत करतात. भीती घालवून धीर देतात, प्रोत्साहन देतात.(navi umed)
SendShareTweet
Previous Post

मनसेकडून शिराढोणमध्ये एक सही संतापाची

Next Post

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय जमिनींची तातडीने निश्चिती करा

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय जमिनींची तातडीने निश्चिती करा

पदोन्नतीबद्दल वनिता साळुंके यांचा रूईभर येथे सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जांची खरेदी; इच्छुकांनी ‘इतके’ अर्ज केले खरेदी

January 16, 2026

पुणे महापालिका निवडणुकीत गिरीराज सावंत यांचा पराभव

January 16, 2026

धाराशिव नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदासाठी लढत; अक्षय ढोबळे यांचा १३ मतांनी विजय

January 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group