आरंभ मराठी/ धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात पोलिस शिपाई भरतीची प्रतीक्षा अखेर संपली असून जिल्हा पोलिस दलातील एकूण १४८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये पोलिस शिपाई संवर्गातील १२३ पदे आणि चालक पोलिस शिपाई संवर्गातील २५ पदांचा समावेश आहे. या भरतीमुळे जिल्ह्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.
पोलिस शिपाई पदांच्या १२३ जागांमध्ये आरक्षणानुसार — अनुसूचित जाती २६, अनुसूचित जमाती १५, वि.ज.अ. ३, इतर मागास वर्ग २४, एसईबीसी १२, इडब्ल्यूएस १२ आणि खुला वर्ग ३१ जागा राखीव आहेत.
तर चालक शिपाई पदांच्या २५ जागांमध्ये अनुसूचित जाती ३, अनुसूचित जमाती १, वि.ज.अ. १, भ.ज.ब. १, भ.ज.क. १, भ.ज.ड. १, वि.मा.प्र. १, एसईबीसी ३, इडब्ल्यूएस २ आणि खुला वर्ग ८ जागा आहेत. लवकरच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, पुढील तीन महिन्यांत ही भरती पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात येणार असून, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना वाव दिला जाणार नाही. कोणी पैशाची मागणी केली किंवा फसवणुकीचा प्रयत्न केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









