आरंभ मराठी / धाराशिव
बांधकामासाठी साहित्य पुरवण्यासाठी कंपनीला 2 कोटी 20 लाख रुपये देऊनही कंपनीने धाराशिव येथील व्यक्तीला बांधकामाचे साहित्य न देऊन तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, यातील
आरोपी जन्नु ओस्वाल (रा. टिंबर मार्केट पुणे), वेलकम ट्रेडर्सचे मालक विक्रम शंकरलाल जाजोट (रा. प्लॉट नं 214 संत तुकाराम रोड हिंदुस्थान को ऑ बॅक समोर मुंबई), आशा पुरा स्टील ट्रेडर्स आळंदी पुणे याचे मालक मांगीलाल सुनाजी पुरोहित या तिघांनी दिनांक 5 मार्च 2024 ते 19 मार्च 2024 दरम्यान फिर्यादी दिलीप दादासाहेब साळुंके ( वय-50 हरिश्चंद्र नगर, जुना उपळा रोड, धाराशिव) यांच्याकडून बांधकामाचे साहित्य स्टील, सिमेंट पुरवतो म्हणून 2 कोटी 20 लाख रुपये आरटीजीएस च्या माध्यमातून घेतले होते. आरोपींनी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बॅक शाखा उल्हासनगर येथील शाखेच्या अकाउंटवरील क्र 1646020000000228 वर ही रक्कम स्वीकारली आहे.
परंतु, पैसे घेऊनही त्यांनी फिर्यादीला बांधकामाचे साहित्य पुरवले नाही तसेच पैसेही परत केले नाहीत. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करुन आर्थिक फसवणुक केली.
दिलीप साळुंके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं.कलम 420,406.34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.