तुळजापूर तालुक्यात खळबळ
गणेश गायकवाड / आरंभ मराठी
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या 97 सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केले केल्यामुळे चार गावच्या सरपंचासह 93 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अपात्र घोषित केले असून,यामुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आलेला असतो. या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे सदस्यांना बंधनकारक असते. परंतु तुळजापूर तालुक्यातील निवडून आलेल्या 93 सदस्यांनी व चार गावच्या सरपंचानी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार 12 मार्च रोजी आदेश अपात्रतेबाबत आदेश दिले आहेत.
कोण कोण ठरले अपात्र ?
अपात्र ठरलेल्यामध्ये पांगरदरवाडीच्या सरपंच सिंधू कृष्णात पोफळे, गंजेवाडीच्या सरपंच शेख शाईन फियाज, नंदगावच्या सरपंच राधिका विद्यानंद घंटे, मूर्टाच्या सरपंच मीना विजय कुमार लोहार यांना अपात्र केले आहे. यांच्यासह सदस्य 93 ग्रामपंचायत सदस्यांमध्ये बंदपट्टे उज्वला मधुकर अणदूर, शेख नसीबा फारुख (आरळी बुद्रुक), भिसे पद्मिनी संतोष कदमवाडी, पात्रे संगीता श्रीशैल कसई, मनीषा बालाजी मुळे काळेगाव, विशाल रामचंद्र मुळे काळेगाव, स्वामी सिद्धलिंग मल्लिकार्जुन किलज, क्षीरसागर संतोष सोमनाथ कुंभारी, कोळी संगीता नागेश कुंभारी, बालिका अभिमन्यू जवान खडकी, माळी सुजाता सुरेश खानापूर, कागे राजश्री नामदेव जळकोट, कांबळे भाग्यश्री शहाजी जवळगा मेसाई, मस्के मंडाबाई पंडित जवळगा मेसाई, सत्यभामा वीरभद्र पोतदार तीर्थ खुर्द, गायकवाड संतोषी तानाजी दहिवडी, अंधारे सुजाता शिवाजी दहिवडी, विकास मच्छिंद्र थोरात देवकुरुळी, राम ज्ञानदेव कोळी देवकुरुळी, चव्हाण अनिल किसन धनगरवाडी, राहुल अशोक माळी पिंपळा खुर्द, देवकर राजश्री लक्ष्मण बाबळगाव, कदम नंदिनी मिनीनाथ बिजनवाडी, कांबळे निलावती बाळू भातंब्री, लोंढे सुरेखा राजेंद्र भातंब्री, हजारे गंगाबाई पांडुरंग मंगरूळ, कसबे लिंबराज रघुनाथ येवती, डोंबाळे सुप्रिया सूर्यकांत येवती, गोरे दिपाली अनिल शहापूर, कांबळे मधुबाई महादेव वाणेगाव, गोरे दिपाली अनिल शहापूर, महाबोले मुक्ताबाई बाबुराव सराटी, दुपारगुडे रेश्मा विद्याधर सराटी, महादेव निवृत्ती सुरवसे सराटी, राठोड गोविंद सुभाष सराटी, सिद्ध गणेश सिंधू सुरेश सिंदफळ, सिद्ध गणेश धम्मपाल गौतम सिंदफळ, ठोंबरे पुनम शेषेराव सिंदफळ, माळी जयश्री उमेश सिंदफळ, इनामदार याकूब मुस्तफा सिंदफळ, गायकवाड रंजना मनोज सिंदफळ, कांबळे रंजना परमेश्वर हंगरगा नळ, कांबळे नवनाथ विश्वंभर हंगरगा नळ, घोडके महानंदा अंबादास हंगरगा नळ, कलशेट्टी नागरबाई दत्तात्रय हंगरगा नळ, साखरे उषा यादव हिप्परगा ताड, आरबळी येथील सदस्य काजल नदाफ पिंजारी, उबाळे सीताबाई सिद्राम, नदाफ हसीना सुरज, उमरगा चिवरी येथील बनसोडे कोमल जगन्नाथ, पिंजारी मोहम्मद काशिम, काक्रंबा येथील सुरवसे निर्मला दुर्वास, काटगाव येथील घोडके भारतबाई जालिंदर, धुते कोमल योगेश, कांबळे इंदुबाई अंकुश, घोडके भारतबाई जालिंदर, काटी येथील कुरेशी बिस्मिल्ला मंजूर, शिंदे रंजना बाळासाहेब, सोनवणे प्रकाश रामचंद्र, कामठा येथील शैला संतोष क्षीरसागर, कुन्सावळी येथील वाघमोडे विकास लक्ष्मण, सुतार कोंडाबाई बाबा, केशेगाव येथील घंटे शंकर सिद्राम, गुजनुर येथील मोरे नामदेव बाबू व वाघमारे कमाबाई तुकाराम, गुळहळी येथील काळुंके छाया नागनाथ, गायकवाड नितीन व्यंकट चिकुंद्रा, देवसिंगा तूळ येथील वाघमारे करिष्मा रवी, चिवरी येथील देडे रवी विमा, चिमणे लता उत्तम, देवसिंगा नळ येथील राठोड दयानंद भीमला, नंदगाव येथील शेवाळे प्रज्वला दत्तात्रय, बोरनदवाडी येथील पवार काजल गोवर्धन व जाधव सिद्राम मनु, गोळेगाव येथील रुपनूर अंकुश अरुण, मूर्टा येथील गवळी शिवगंगा गुणवंत, चव्हाण सुमन नामदेव, थोरात सिंधुबाई अशोक, राठोड संजय कोंडीबा, लोहगाव येथील बनसोडे म्हाळप्पा तम्मा, बनसोडे अश्विनी अमोल, वडगाव लाख येथील चंदनशिवे कुसुम दत्ता, वागदरी येथील बिराजदार मीनाक्षी महादेव, शिरपूर येथील गायकवाड छायाबाई राम, शिरगापुर येथील सुळ सत्यभामा विठ्ठल, सलगरा मड्डी येथील वाघमारे मीनाक्षी चंद्रकांत, इटकर राजेंद्र वेंकना, सांगवी काटी येथील बनसोडे नामदेव परमेश्वर, सावरगाव येथील व्हटकर सुषमा सतीश, तानवडे परमेश्वर चंद्रकांत, हंगरगा तूळ येथील डुकरे मुक्ता अंबादास व होणाळा येथील मस्के महेश गोविंद यांचा समावेश आहे.