• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, January 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Tuljabhavani Navratri तुळजाई नगरी सज्ज, उद्यापासून नवरात्रोत्सव, तुळजाभवानी मातेच्या मंदिराची आकर्षक सजावट

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 2, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
660
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी घेतला तयारीचा आढावा, मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्गावर सावली

सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर: मंदिराच्या शिखरावर केलेली रंगरंगोटी, मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्गावर आकर्षक रंगीत कपड्याने तयार केलेली सावली आणि विद्युत रोषणाई, फुलांची सुरू असलेली सजावट,यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा मंदिर परिसर सुशोभित आणि चैतन्यमय झाला आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि परिसरात लगबग सुरू आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.भवानी ज्योत नेण्यासाठी गर्दीआई राजा उदो उदोच्या गजराने तुळजाई नगरी दुमदुमून गेली आहे.नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भवानी ज्योत नेण्यासाठी मंगळवारपासून तरुण कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरूवारपासून (दि.3) आरंभ होत आहे. गुरूवारी पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन महाभिषेकानंतर दुपारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाची सुरूवात होईल.त्यानंतर तुळजापुरात घरोघरी घटस्थापना होईल. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात मंदिर संस्थानने जोरदार तयारी केली असून,मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी डॉ. ओबासे प्रत्येक बाबींचा आढावा घेत आहेत.त्यांच्या कार्यकाळातील हा तिसरा नवरात्रोत्सव आहे.2022 मध्ये त्यांची नवरात्रोत्सवाच्या काही दिवस आधी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती.बाजारपेठेत उत्साह
शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान महाराष्ट्र, आंध्र,कर्नाटकासह देशभरातून लाखो भाविक तुळजापूरला येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी विचारात घेऊन कार पार्किंग येथे 25 हजार क्षमतेचा दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. नवरात्रोत्वसाच्या पार्श्वभूमीवर भवानीज्योत नेण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळानी मंगळवारी सायंकाळपासूनच गर्दी केली होती. अनेक गावातून तरूण कार्यकर्ते या उत्सवासाठी तुळजाईनगरीत दाखल होत आहेत. ढोल, ताशा, हलगीच्या गजरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. उत्सवाच्या‍ निम‍ित्ताने बाजारपेठ गजबजून गेली आहे. बाजारपेठेत भाविकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. हळदी-कुंकूसह प्रासादिक भांडार, उपहारगृहे भाविकांनी गजबजली आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भाविकांची गर्दी वाढण्याचा अंदाज असून, त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात व्यवसाय होईल, असा विश्वास व्यापारी वर्गाला वाटतो.दरम्यान, यासाठी मंदिर प्रशासनाने जोरदार तयार केली असून, शहरात बँरेकेटींग तसेच विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत.उद्या घटस्थापना, 16 तारखेला कोजागिरी उत्सव
घटस्थापनेनंतर श्री देवीजींच्या वेगवेगळ्या दिवशी महापूजा होतील.त्यात रथ अलंकार महापूजा, मुरली अलंकार महापूजा, शेषशायी अलंकार महापूजा तसेच भवानी तलवार अलंकार महापूजा व महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजेचा समावेश आहे. महानवमीली म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता धार्मिक विधी व घटोत्थापन होणार असून, त्यानंतर विजयादशमी (दसरा) सार्वत्र‍िक सिमोल्लंघण, नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी पहाटे देवीचे स‍िमोल्लंघन पार पडणार आहे. त्यानंतर देवीजींची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. अश्विन शुक्ल बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असून, गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सायंकाळी सोलापूरच्या काठ्यासह छबिना होणार असून, महंतांच्या जोगव्याने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

Tags: #chatrapatishivajimaharaj#tuljapur #navrati #utsav #tuljabhavani #temple
SendShareTweet
Previous Post

धीरज पाटलांच्या निष्ठावंत मेळाव्याकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पाठ, मधुकर चव्हाणांचा गट ठरतोय वरचढ

Next Post

Tuljabhavani Temple आई राजा उदो-उदोच्या जयघोषात घटस्थापना, तुळजापुरात नवरात्रोत्सवास प्रारंभ

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

Tuljabhavani Temple आई राजा उदो-उदोच्या जयघोषात घटस्थापना, तुळजापुरात नवरात्रोत्सवास प्रारंभ

Farmer's News गेल्यावर्षी पीक विमा नाही, यावर्षी अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले; प्रचंड नुकसान,तरीही धाराशिव जिल्ह्यावर अन्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दिलासा; जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होणार

January 12, 2026

शेतवस्तीवर दरोडा टाकणाऱ्या चार अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 11, 2026

ब्रेकिंग | तडवळ्यात गावठी कट्टा व तीन फायटरसह आरोपी जेरबंद, ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

January 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group