• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 12, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

लेडीज क्लबच्या प्रांगणात हिरकणी महोत्सवाला दिमाखात प्रारंभ; आमदार पाटील म्हणाले, हिरकणी महोत्सव महिलांच्या हक्काचे व्यासपीठ

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 6, 2024
in उत्सव
0
0
SHARES
23
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

लेडीज क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात करण्यात आले. महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील अनेक वर्षापासून लेडीज क्लबच्या माध्यमातून ‘हिरकणी महोत्सव’ आयोजित करण्यात येत असून, नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेत आत्मनिर्भर बनत महिलांनी विकसित भारताच्या संकल्प यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब आयोजित हिरकणी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात १५०० हून अधिक उद्योजकांनी प्रधानमंत्री/मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून विविध उद्योग सुरु करत स्वतःला व इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला बचत गटांनी ड्रोनद्वारे शेती मशागतीची कामे करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या, जिल्ह्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यासाठी लेडीज क्लबच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महालक्ष्मी सरस भीमथडी जत्रा तसेच महिला बचत गटांच्या वेगवेगळ्या उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनासाठी धाराशिव जिल्ह्यातील महिला बचत गटांना नेऊन त्याची विक्री व्यवस्था तसेच मार्केटिंग शिकवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर्षी संक्रांतीचे वाण म्हणून श्रीराम प्रभूंच्या मूर्ती महिलांना देणार असल्याचे सांगत 22 जानेवारीला घरोघरी या मूर्तीचे पूजन करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात १० जानेवारीपर्यंत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे १५० स्टॉल्स मांडण्यात आले असून,महिलांसाठी उद्योजकीय तसेच सांस्कृतिक मनोरंजन, गीत रामायण यासारखे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पहिल्या दिवशी देवीची नऊ रूपे नृत्य अविष्कारामध्ये सादर करणाऱ्या चाळीस महिलांच्या ताफ्याचा नवदुर्गा हा कार्यक्रम संपन्न झाला. महिला उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी सदरील कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज घेऊन उद्योग सुरू केलेल्या जिल्ह्यातील यशस्वी हिरकण्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेशभाऊ देशमुख,माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती महिमा कुलकर्णी यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नितिन बागल, अजितदादांच्या हस्ते नियुक्तीपत्र,अभिनंदनाचा वर्षाव

Next Post

जिल्हा पत्रकार संघाच्या शिबिरात १७७ जणांची तपासणी,आता दरवर्षी पत्रकार आणि त्यांच्या कुटुबियांसाठी तपासणी शिबिर

Related Posts

श्री.सिद्धिविनायक परिवाराचे कार्य गणपतराव देशमुखांप्रमाणे आदर्शवत

May 26, 2024

शिराढोणच्या राम नगरीत दोन दिवसांचा उत्सव, श्रीराम मंदिरात होणार श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा

January 21, 2024

मसणजोगींच्या प्रतिनिधीला अयोध्येचे निमंत्रण, सवाद्य मिरवणूक काढून निरोप

January 17, 2024

भगतवाडीमध्ये भगवती देवीची यात्रा; उत्साहात साजरी

January 12, 2024

दिव्यांची आरास अन् फुलांच्या माळांनी सजला परिसर; गीत रामायण नृत्याविष्काराने धाराशिवकर भारावले, कार्यक्रमाला अलोट गर्दी

January 10, 2024

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमरसिंह देशमुख, भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन

December 11, 2023
Next Post

जिल्हा पत्रकार संघाच्या शिबिरात १७७ जणांची तपासणी,आता दरवर्षी पत्रकार आणि त्यांच्या कुटुबियांसाठी तपासणी शिबिर

कळंबमध्ये शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दिंडेगाव शिवारात अवैध बायोडिझेलची विक्री; तीन हजार लिटर बायो डिझेलसह गावकऱ्यांनी टँकर पकडला

May 12, 2025

दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर; ‘या’ दिवशी लागणार निकाल

May 12, 2025

धाराशिवमध्ये पालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

May 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group