स्पर्धेला ९५० मल्ल येणार, आयोजक सुधीर पाटील यांची माहिती
प्रतिनिधी/ धाराशिव
६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गुरूवारपासून धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर प्रारंभ होत आहे. १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेची जय्यत तयारी झाली असून, दररोज एक लाख प्रेक्षक उपस्थित राहतील अशी माहिती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला येणाऱ्या ९५० पैलवान खेळाडूची निवास व्यवस्था श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे करण्यात असून,या स्पर्धेसाठी येण्याऱ्या
200 पंचांची व टीम व्यवस्थापकांची व्यवस्था शहरातील विविध हॉटेलात करण्यात आली आहे तसेच महिला प्रेक्षकांना स्वतंत्र विशेष गॅलरीचे व्यवस्था करण्यात आली आहे , तर
राज्यभरातून येण्यार्या कुस्ती प्रेमींसाठी धाराशिव जिल्हावासियांकडून व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रेक्षक गॅलरीसाठी विविध प्रतिष्ठित मान्यवरांची व नामांकित खेळाडूची नावे देण्यात आली आहेत.
या पत्रकार परिषदेला या स्पर्धेचे मुख्य कार्यवाहक तथा युवा उदयोजक अभिराम सुधीर पाटील, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव वामनराव गाते,धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर , माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे , साखरे अप्पा , गोविंद घारगे , शरद गवार , बबलू धनके , संजय पारवे , अनिकेत मोळवणे , सुंदर जवळगे , अनिल अवधूतसह नामांकित मल्ल व वस्ताद आदी उपस्थित होते.