प्रतिनिधी/ शिराढोण
शिराढोण पासून 5 किलोमीटर अंतरावरील एकुरगा गावाच्या हद्दीत माळची आई हे जगदंबा देवीचे जागृत देवस्थान आहे.नवरात्रानिमीत्त या मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सोबतच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळख असना-या या जगदंबा देवीच्या मंदीरात कळंब तालुक्यासह परिसरातील भाविक दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात.
शिराढोण -एकूरगा मार्गावरील माळरानावर या देवीचे 500 वर्षापुर्वीपासून वास्तव्य असल्याने या देवीला माळची आई म्हणून संबोधले जाते. या मंदिराचा कारभार ट्रस्टच्या माध्यमातून पाहिला जातो. या मंदिराचे बांधकाम लातूर येथील देवीभक्त अॅड.कालीदास नानासाहेब देशपांडे यांनी स्वखर्चातून केले आहे. अॅड.देशपांडे हे या मंदिराच्या विकासासाठी तसेच रंगकाम, सुशोभिकरणासाठी सातत्याने दरवर्षी आपला मोलाचा वाटा देतात. काही वषार्पूर्वी या देवस्थानास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला मिळाला आहे. प्रती वर्षाप्रमाणे या वर्षी विधीवत घटस्थापना करण्यात आली असून, मंदीर परिसर स्वच्छ करुन घेण्यात आला आहे तसेच मंदिराभोवती विद्यूत रोषणाईही करण्यात आली आहे. नवरात्रामध्ये यावर्षी विविध समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिराढोण परिसरातील नवदाम्पत्य या देवीचे दर्शन घेवूनच आपल्या नविन संसारिक जीवनास प्रारंभ करतात. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेस माळची आई देवीची मोठी यात्रा भरते. कळंब तालुक्यासह परिसरातील भाविक यात्रेस हजेरी लावतात. यावषीर्ही यात्रेसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.