• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 17, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शाश्वत पाणी, रोजगार आणि सकारात्मक विचार, या त्रिसूत्रीवर भर देणार; नागरी सत्कारानंतर आमदार राणा पाटील यांचे प्रतिपादन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 1, 2023
in मराठवाडा
0
0
SHARES
25
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

पंधरा महिन्यात पाच हजार कोटींचा निधी आणल्याबद्दल युथ फोरमच्या वतीने सन्मान

प्रतिनिधी / धाराशिव

धाराशिव जिल्हा मागास नाही, असे बोलणारे लबाड आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी जिल्ह्याला विकासाच्या एका टप्प्यावर आणून ठेवले आहे. शाश्वत पाणी, हक्काचा रोजगार आणि सकारात्मक मानसिकता या तीन महत्वपूर्ण बाबींवर आपला भर आहे. त्यामुळे किती हजार कोटी रूपयांचा निधी आणला, यापेक्षा कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विकासाचा हा प्रवास सुरू आहे, हे अधिक महत्वाचे आहे. ठाकरे सरकारच्या काळात रखडलेल्या जिल्ह्याच्या सगळ्या महत्वपूर्ण बाबींना आता वेग आला आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

मागील 15 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध प्रकल्प आणि योजनांसाठी पाच हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी खेचून आणल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा युथ फोरमच्यावतीने नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवारी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार शहाजीबापू पाटील, महंत तुकोजीबुवा, महंत मावजीनाथबुवा, जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, अनंत आडसूळ, डॉ. सतीश कदम यांच्यासह शहर व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरूणांनी आयोजित केलेला हा नागरी सत्कार एवढा भव्य असेल याची आपल्याला कल्पना नव्हती. या सत्काराने आपल्याला हत्तीचे बळ मिळाले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या विकासकामांची माहिती पुढील पिढीला होणे आवश्यक आहे. ती करून देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र आज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून केलेल्या कामाचा हा परीपाक आहे. जिल्ह्यासाठी 10 हजार रोजगार निर्मितीची क्षमता असलेला टेक्नीकल टेक्सटाईल पार्कचा प्रकल्प ठाकरे सरकारमुळे रखडला होता. त्याला आपल्या सरकारने मंजुरी दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. कृष्णा खोर्‍यातील सात टीएमसी पाण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. पुढील वर्षभरात जिल्ह्यात पाणी दाखल होईल. उर्वरित 14 टीएमसी पाण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. आपण सर्वांनी सत्काराच्या माध्यमातून दिलेला आशीर्वाद आणखी काम करण्यासाठी बळ देणारा असल्याचे आमदार पाटील यांनी नमुद केले.

यावेळी प्रा. डॉ. गणेश बेळंबे, प्रा. डॉ. सतीश कदम, पत्रकार अनंत आडसूळ, जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी युथ फोरमच्या ऐश्वर्या सक्राते यांनी प्रास्ताविक केले. दौलत निपाणीकर यांनी सूत्रसंचालन तर आभार सूर्याजी गायकवाड यांनी मानले.

शहाजी पाटील रमले जुन्या आठवणीत

आपल्या राजकीय कारकिर्दीत विधानसभेसाठी पहिली उमेदवारी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दिली. डॉ. पाटील यांनी राज्याच्या राजकारणात दिलेले योगदान अनेक उदाहरणांसह शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितली. मराठवाड्याच्या विकासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील, शिवराज पाटील चाकूरकर, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर या पाच रत्नांनी मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच समाजसेवेचा वारसा आमदार राणाजगजितसिंह पाटील चालवत आहेत. पाच नाही तर सात हजार कोटी रूपये धाराशिव जिल्ह्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मिळविले आहेत. आपण स्वतः फडणवीस यांची भेट घेवून धाराशिवकरांच्या मनातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात असा कर्तव्यदक्ष आमदार असायला हवा, असे मतही शहाजीबापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी नानासाहेब शेळके, विश्वंभर पाटील, प्रताप देशमुख, सुभाष कोळगे, प्रकाश जगताप, बजरंग ताटे, ॲड रामभाऊ गरड, एकनाथ राजेनिंबाळकर, हुंकार बनसोडे, ॲड तानाजी चौधरी, संजय मंत्री, ॲड गजानन चौगुले, बशीर तांबोळी, सुभाष पवार, चन्नू राठोड, प्रभाकर निपानीकर, आबासाहेब सोपान पवार, रजा शेख, भालचंद्र हुच्चे, दत्तात्रय अंबुरे, कल्याण बेताळे, गौतमराव इंगळे, मयुर काकडे, आबासाहेब खोत, राजाभाऊ बागल, राम कुलकर्णी, कल्याण अप्पा पवार, सज्जनराव साळुंके, मधुकर मामा तावडे, धनाजी आनंदे, श्रीकृष्ण भन्साळी, संतोष देशपांडे, डॉ. मनोज घोगरे, डॉ. सत्यवान शिंदे, शरद सस्ते, शिवाजीराव गपाट, वसंतराव नागदे, कमलाताई नलावडे, सतिश कदम, गणेश बेळंबे, अनंतराव अडसूळ, काटीकर महाराज, रामदास वंजारी, धनंजय रणदिवे, चंद्रसेन देशमुख, रविंद्र केसकर, प्राचार्य सुलभा देशमुख, भास्कर दादा खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

वाशीमध्ये 80 वर्षांच्या आजींनी केले श्रमदान; एक तास,एक साथ या उपक्रमात नागरिकांचा हिरीरीने सहभाग

Next Post

कळंबमध्ये बेकायदेशीर होर्डिंग्ज; शहराचे विद्रुपीकरण, पालिकेची डोळेझाक कुणासाठी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कळंब पालिकेला बंधनकारक नाहीत का..?

Related Posts

यशाचा चढता आलेख; धाराशिवच्या श्री.सिद्धिविनायक परिवाराचे आता विमा क्षेत्रातही पाऊल, सर्व प्रकारचा विमा काढता येणार

January 2, 2024

Dharashiv-Tuljapur Railway नववर्षारंभी धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा..! पहिल्या टप्प्यात 30 किलोमीटरचे काम, सांजा, वडगाव, तुळजापूर स्टेशन

December 9, 2023

जिल्ह्यातील १५ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून योजना कार्यान्वित

November 19, 2023

आरक्षणाचा लढा पेटला, उपसरपंचाने दिला राजीनामा; आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री, मुद्दा तापणार

October 25, 2023

बाजार समितीच्या सभेत विविध क्षेत्रातील 40 जणांचा सत्कार; खासदार ओमराजेंची सरकारवर टीका, म्हणाले.. हे तर खोकेवाल्यांचे सरकार, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही

September 30, 2023

हा लढा म्हणजे केवळ मराठवाडा मुक्तीसंग्राम नव्हे, हा तर भारत मुक्तीसंग्राम : युवराज नळे यांचे मत

September 12, 2023
Next Post

कळंबमध्ये बेकायदेशीर होर्डिंग्ज; शहराचे विद्रुपीकरण, पालिकेची डोळेझाक कुणासाठी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कळंब पालिकेला बंधनकारक नाहीत का..?

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठी उद्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमसोबत करार; महाराष्ट्रात राजकारण तापले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भव्य सन्मान सोहळा; 90 टक्क्यांवर गुण घेणाऱ्या दहावीच्या 350 विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार

May 17, 2025

आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून विनोद गपाट यांची 29 लाखांची फसवणूक

May 17, 2025

भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीचा पत्रा लागून ईट येथे अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

May 17, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group