गजानन तोडकर / कळंब
कळंब शहरात १११११ वृक्षारोपणाचा ऐतिहासिक उपक्रम शनिवारी (दि.५) कळंब तालुका वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष असून, यामुळे कळंब शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कळंब शहरात वृक्षारोपणाची जनजागृती व्हावी, या दृष्टिकोनातून वृक्ष दिंडीचे आयोजन केले होते.३१११ विद्यार्थ्यांनी कळंब पोलीस स्टेशन ते विद्याभवन हायस्कूल,अशी दिंडी काढली.यावेळी सकल कळंबकर उपस्थित होते.दरम्यान या उपक्रमाला कळंब तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत यासाठी सुमारे 10 लाख रुपये लोकवाटा जमा झाला आहे.
गुरुवारी निघालेल्या वृक्षदिंडीमध्ये 3111 विद्यार्थ्यासह नागरिक विविध संघटनेने सहभाग नोंदवला. वृक्षदिंडीची सुरुवात कळंब पोलीस स्टेशन येथून झाली. त्यानंतर देवी रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे विद्याभवन हायस्कुल येथे दिंडीचा समारोप झाला. यावेळी कळंब वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश IPS m.ramesh, पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांनी मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोकांनी या वृक्ष लागवडीत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी सचिव आनंद बलाई,संवर्धन समितीचे सदस्य विलास पाटील,संजय देवडा,विद्याभवनचे मुख्याध्यापक पवार,सुशील तीर्थकर,गणेश सदाफुले,प्राचार्य जगदीश गवळी,परमेश्वर पालकर,मंगेश यादव,सतीश मातने,महादेव महाराज आडसूळ,रवी कोल्हे, ॲड.मनोज चोंदे, युवराज मुरकुटे, नितीन लिमकर, राजेंद्र बिक्कड,प्रकाश भडंगे आदी मान्यवर मंडळी यांची उपस्थिती होती.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्याकडून 51 हजारांची देणगी
गेल्या काही दिवसापासून सातत्याने कळंब तालुका वृक्ष संवर्धन समितीचे काम सुरू असून, त्याचे मूर्त स्वरूप ५ ऑगस्ट रोजी येणार आहे. या दृष्टिकोनातून कळंब शहरात व तालुक्यात जोरदार तयारी असून, अनेक स्वयंसेवी संस्था,व्यक्ती व संघटना एकत्र येत आहेत. यासाठी अनेक देणगीदार देणगी देऊन सहकार्य करत आहेत. गुरुवारी डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे. भारतीय जीवन विमा (LIC OF INDIA) शाखा कळंब कर्मचारी यांच्या वतीने 11 हजार रुपयांचा धनादेश दिला व त्यासोबत उस्मानाबाद जनता बँकेकडून २० हजार रुपयांचा धनादेश दिला. आजपर्यंत १० लाख रुपयांचा लोकवाटा जमा झाला आहे.