प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यात गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यावर्षी मान्सून उशिरा आल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या आहेत.परंतु पेरण्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे,खत तसेच शेतात केलेली मेहनत वाया गेली आहे.त्यामुळे पशुंच्या चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शेतकरी दु:खी व कष्ठी होऊन आर्थिक विवंचणेत सापडला आहे.त्यामुळे शासनाने लोहारा तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, २१ दिवस पावसाने खंड दिल्यास पिकविमा कंपनीने २५% अग्रीम रक्कम देणे बंधनकारक आहे ती मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी कांद्यावरील जाचक असणारे ४०% निर्यात शुल्क कमी करावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीसाठी सगल १२ तास उच्च दाबाने दिवसा लाईट द्यावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण लाईटबिल माफ करण्यात यावे तसेच पशुधनाची मोजणी करुन पशुधनासाठी मोफत चारा उपलब्ध करुन देण्यात यावा.या मागणीसाठी लोहारा तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार एम.जी. जाधव यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी शिवसेना जिल्हासंघटक दिपक जवळगे,शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,शहरप्रमुख सलिम शेख, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राजेंद्र कदम,विरपक्ष स्वामी,शिवदुत महेबुब गंवडी,श्रीमंत पाटिल,रेबेचिंचोलीचे उपसरपंच पवन मोरे,नितिन सुर्यवंशी,हाराळीचे उपसरपंच दत्तात्रय पाटील, युवासेना शहरप्रमुख दिनेश गरड,दत्ता पाटील,महेश चपळे, बळीराम गोरे,अनिल विशाल बडुरे,बापूसाहेब ढोणे,राशीद फकीर,संतोष जावळे,दत्तात्रय पाटील,पुरुषोत्तम सितापुरे, रविंद्र भोंडवे,राजकुमार मोरे,पांडुरंग कुंभार,श्रीकांत कांबळे, चेतन गोरे,कुलदिप बडुरे,रघुवीर घोडके,आकाश जावळे, काशिनाथ गोरे,शहबाज सय्यद,आनंद रोडगे,किशोर भालेराव,पद्माकर गुळवे,हनुमंत माळी ,लक्ष्मण सूर्यवंशी, मारुती फुलसुंदर,राजेंद्र कदम,संजय कोठार,पळसे राजेंद्र, शिरसाट जे.डी,हनुमंत मोगळे,आकाश जाधव,शुभम साळुंखे,काकासाहेब मुळे,कमलाकर बिराजदार,राजेंद्र सूर्यवंशी,अनंत घोडके,हनुमंत बनसोडे,बिबीशन नरगळे,सुरेंद्र जाधव,दिनकर नरगळे,अप्पू स्वामी,लक्ष्मण डिग्गीकर,नागनाथ मदने,नागेश थोरात,रामराव चव्हाण, रमेश जाधव,सतीश राठोड,रघुनाथ राठोड यासह शिवसैनिक, युवासैनिक व शेतकरी उपस्थित होते.












