प्रतिनिधी / नळदुर्ग
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना लाभ मिळावा, विविध योजनाची माहिती मिळावी, या हेतूने शासनातर्फे हाती घेण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रम बुधवारी (दि.१४) शहरातील बी. के.हॉल येथे राबविण्यात आला.
उपक्रमाची सुरुवात खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली, याप्रसंगी तुळजापूरचे प्रभारी तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते उपस्थिताना रोपे वाटप करून स्वागत करण्यात आले.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपक्रम
नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे,सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देखील नसते. अशा नागरिकांना या अभियानाअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल,सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागायचे, या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी सरकारतर्फे ‘ शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबविला जात आहे.
या अभियानाअंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये रोजगार मेळावे,
आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर,दिव्यांगांना साहित्याचे वाटप,
कृषी प्रदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट बाजार यांच्या आयोजनासोबत नवीन मतदार नोंदणी,शेतीसाठी विद्युत पुरवठा करणे, तहसील मधून विविध प्रमाण पत्रवाटप करणे आदी सारख्या समाजोपयोगी योजना प्रशासन प्रणालीद्वारे राबविण्यावर भर दिला जात आहे.किसान क्रेडिट कार्ड योजना,महिला बचत गट समृध्दी कर्ज योजना, समाज कल्याण योजना महाराष्ट्र नवीन विहीर योजना,नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प (पोकराअंतर्गत),अटल पेन्शन योजना, नवीन विहीर (पोकराअंतर्गत), विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशा अनेक योजनाची माहिती या माध्यमातून मिळत आहे.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी शासनातर्फे निधीची तरतूद देखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बोलताना तहसीलदार शिंदे यांनी दिली.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरध्यक्ष नययर जाहगीरदार,माजी नगरसेवक शहबाज काझी, शफी भाई शेख,मुश्ताक कुरेशी, इमाम शेख,शिंदे गट उपता प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, भाजप उद्योग आघाडीचे सुशांत भूमकर, भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे, शिवसेनेचे सरदारसिंग ठाकूर, ठाकरे गटाचे शराध्यक्ष संतोष पुदाले, सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागीरदार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तहसीलदार शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन, आभार भैरवनाथ कानडे यांनी मानले.