पुणे;
नवीन गाडी खरेदी करताना वाहनधारक गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतात.यावेळी कंपनीकडून मजबुतीचा दावाही केला जातो आणि गाडीच्या वैशिष्ट्ये सांगितली जातात.मात्र एका शेतकऱ्याने महिंद्रा थार गाडीची क्षमता तपासण्यासाठी चक्क शेतात नांगर जुंपून एक एकर शेत नांगरूनही काढले. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर या गावात घडला. मधुकर तोंडे,असे या शेतकऱ्याचे नाव असून शेतकऱ्याने नुकतीच ठार गाडी खरेदी केली होती. या गाडीची क्षमता ट्रॅक्टरच्या तुलनेत कशी आहे हे तपासण्यासाठी शेतकऱ्याने आपल्या शेतात थार गाडीला नांगर जुंपला आणि एक एकर क्षेत्र नांगरून काढले.
मात्र या काळात ट्रॅक्टरपेक्षा थार गाडीसाठी डिझेलचा वापर जास्त झाला, असे त्यांनी सांगितले. मात्र या गाडीची मजबुती उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्याच्या या प्रयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे.