प्रतिनिधी / येडशी
देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे येडशीजवळ डॉक्टरानी एका महिलेसह दोन नवजात बालकाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
येडशी जवळ लातूर रस्त्यावर दोन किलोमीटर सम्राट हॉटेलच्या बाजूला काही कामगार राहत होते. तिथे एका गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी १०८ नबंर फोन करुन आरोग्य सेवा मागितली.मात्र, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली, मात्र महिलेची प्रकृती गंभीर स्वरूपाची होती.त्यामुळे तिला दवाखान्यात नेण्याएवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता.त्यामुळे रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी एका खोलीतच महिलेची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला. सदरील गर्भवती मातेला दोन जुळी बाळ जन्माला आली. त्यामध्ये एका बाळाची प्रकृती नाजूक होती.डॉ.अंकुश मडावी यांनी उपचार करून प्रकृती चांगली केली. त्यामुळे बाळाचा जीव वाचला. डॉक्टरांना रुग्णवाहिकेचे चालक मुन्ना बागवान यांनी सहकार्य केले. या उपचाहाराबद्दल ग्रामस्थांकडून डॉक्टर व चालकाचे कौतुक होत आहे.