• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, April 4, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

रखरखत्या उन्हात वन्यजीवांसाठी पाणवठ्याचा आधार; पळसप येथील पाणवठ्यावरचे क्षण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 4, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
84
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पाण्याअभावी वन्यजीवांचे हाल होऊ नयेत यासाठी धाराशिव तालुक्यातील पळसप परिसरात वन विभागाने पुढाकार घेत पाणवठ्यावर नियमित पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांना दिलासा मिळत आहे.पाणवठ्यावरील पाणी पितानाचे क्षण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

उन्हामुळे नैसर्गिक जलस्रोत आटत चाललेल्या या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत वन्यजीवांना मोठा दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील हरण, ससे, माकडे तसेच इतर लहान-मोठे वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करण्यापासून वाचत असून त्यांना सुरक्षित वातावरणात पाणी उपलब्ध होत आहे. पाण्याच्या शोधात होणारे स्थलांतर आणि त्यातून उद्भवणारे धोके काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पचरंडे, वन परिमंडळ अधिकारी मुदाळे तसेच वनरक्षक ससाने,माने, चव्हाण, सुतार यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.पळसप, जगजी, वरवंटी, घाटंग्री, सोनेगाव आदी भागात अशा पद्धतीने पाणवठे सुरू करण्यात आले आहेत.

स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून या उपक्रमाचे कौतुक होत असून भविष्यातही अशा प्रकारे वन्यजीवांसाठी पाण्याची व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था सातत्याने करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून पर्यावरण संतुलन राखण्यासही याचा मोठा हातभार लागणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #watershed#Moments#water#captured#CCTV#camera
SendShareTweet
Previous Post

पंधरा लाख भाविकांचा उसळला जनसागर; ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात येडेश्वरी यात्रेत चुना वेचण्याचा सोहळा

Next Post

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

Related Posts

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

April 4, 2026

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

April 4, 2026

पंधरा लाख भाविकांचा उसळला जनसागर; ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात येडेश्वरी यात्रेत चुना वेचण्याचा सोहळा

April 4, 2026

शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्याकडून येडेश्वरी यात्रेत महा अन्नदान

April 3, 2026

कामगारच निघाला दरोडेखोर; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ आरोपी जेरबंद

April 1, 2026

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

March 29, 2026
Next Post

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

ताज्या घडामोडी

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

April 4, 2026

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

April 4, 2026

रखरखत्या उन्हात वन्यजीवांसाठी पाणवठ्याचा आधार; पळसप येथील पाणवठ्यावरचे क्षण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

April 4, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group