गुन्हा दाखल, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे ताब्यात, आरोपींचा शोध सुरू
प्रतिनिधी / वाशी
शहरातील तरुणांनी पाळत ठेवत शहरातील साठे नगर भागात अवैध कत्तलखाना उघडकीस आणला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी कत्तलखान्यात पंचनामा करून हत्यारे ताब्यात घेतली आहेत.
वाशी शहरातील साठेनगर भागात अवैध कत्तलखाना येथील गोरकक्षाकानी रात्रभर पाळत ठेवून उघडकीस आणला. रविवारी (दि. २३) रोजी पहाटेच्या सुमारास गोरक्षक पाळत ठेवून होते. यावेळी गोमांस घेवून जाणारी गाडी कत्तलखाण्याजवल आली. वाहनावर पाळत ठेवल्याचा संशय आल्याने गाडीच्या चालकाने गाडी पळवून नेली. त्यांनतर गोरक्षणी कत्तलखान्यात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना गोमांस व हत्यारे आढळून आले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बीट अमलदार शंकर लोंढे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल यांनी येथील कत्तलखान्याची पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.