प्रतिनिधी / वाशी
धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २१) धनगर समाजाच्या वतीने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाशी फाटा येथे शेळ्या मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आरक्षणाच्या मागणीसह चौंडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी
सरकारने वटहुकूम काढून महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत मेंढ्या महामार्गावर सोडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर समाधान ढेंगाने, अमर तागडे, विकास तागडे, धनंजय वैद्य, ऋषिकेश लगास यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या सह्या आहेत.