• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, April 4, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राजकारणाला कलाटणी, बहुमताचा आकडा गाठला; आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे ‘हा’ नवीन पर्याय..

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 17, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने दोन अपक्ष सदस्य गळाला लावल्यानंतर आता थेट आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची भेट घेतली असून, त्यामुळे भाजपच्या सत्ता स्थापनेला अधिक बळ मिळाले आहे. भाजपकडे बहुमताचा आकडा पूर्ण झाला असून, शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली तरी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 19 सदस्य निवडून आले असून, त्यापाठोपाठ शिवसेना पक्षाचे 15, शिवसेना उबाठा गटाचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, काँग्रेसचे 3 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला बहुमतासाठी आणखी 9 सदस्यांची गरज आहे. महायुती म्हणून भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य सोबत आहेत.

पण शिवसेनेतील आमदार डॉ तानाजी सावंत यांचा गट विरोधात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करताना भाजपला शिवसेनेच्या मतांची गरज भासत असताना पक्ष नेतृत्वाने दोन अपक्ष उमेदवारांचा कालच पाठिंबा मिळवला होता.आता शिवसेना नेते आमदार डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचाही पाठिंबा मिळवला असून, या तिन्ही अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावरच भाजप जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करू शकते.मात्र,जिल्ह्यातील शिवसेनेचा दुसरा गट भाजपला साथ देण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळेच शिवसेनेचे काही सदस्य देखील भाजपच्या सदस्यांसोबत सहलीवर गेले आहेत.त्यामुळे आता भाजप सत्तेच्या अधिक जवळ असून, आमदार डॉ.तानाजी सावंत यांच्या गटाला वगळून भाजप सत्ता स्थापन करू शकते अशी एकंदर परिस्थिती आहे.

पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष,

धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार डॉ. तानाजी सावंत म्हणजेच थेट काकांना आव्हान देत परांडा तालुक्यातील जवळा गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. मात्र, आमदार डॉ .सावंत यांनी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार केल्यानंतर धनंजय सावंत कोणाच्या बाजूने जाणार याकडे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी सकाळी धनंजय सावंत यांनी भाजप युवा नेते मल्हार पाटील यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला असून, त्यामुळे आमदार डॉ. सावंत यांचा निर्धार पूर्ण होण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे. धनंजय सावंत यांच्या आणि मल्हार पाटील यांच्या भेटीने भाजपकडे बहुमताचा आकडा पूर्ण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे यदाकदाचित शिवसेनेच्या नेतृत्वाने भाजपसोबत सत्तेत न जाण्याची भूमिका घेतली तरी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 अपक्षांच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेत सहजरित्या सत्ता स्थापन करू शकते.
त्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेला सदस्य फुटण्याची भीती

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे एकूण १५ सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये ८ सदस्य हे डॉ. तानाजीराव सावंत गटाचे आहेत. तर ५ सदस्य हे पालकमंत्री सरनाईक, शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या गटाचे आहेत. उर्वरित २ सदस्य हे मूळचे भाजपाचे कार्यकर्ते असून ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

यामुळे शिवसेनेच्या १५ सदस्यांमध्ये एकूण तीन वेगवेगळे गट स्पष्टपणे दिसून येत आहेत. यापैकी २ सदस्य कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत राहण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते. परिणामी, जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसमोर भाजपसोबत जाण्याशिवाय फारसा पर्याय उरत नाही. जर शिवसेनेकडून याबाबत जास्त ताठर भूमिका घेतली गेली, तर सध्या पक्षात असलेले काही सदस्यही फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वासमोर पक्ष एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

खेड येथील अफू लागवडीवर टास्क फोर्सचा छापा; १२.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार शेतकऱ्यांवर गुन्हा

Next Post

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा ‘गूढ आवाज’; सकाळी ८.०३ वाजता धरणी कंप झाल्याची चर्चा

Related Posts

शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्याकडून येडेश्वरी यात्रेत महा अन्नदान

April 3, 2026

कामगारच निघाला दरोडेखोर; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ आरोपी जेरबंद

April 1, 2026

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

March 29, 2026

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील कामाची घेतली दखल

March 28, 2026

अजितदादांना जाऊन दोन महिने झाल्यानंतर सुनेत्राताई पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

March 28, 2026

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची जोरदार तयारी; रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात

March 28, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा ‘गूढ आवाज’; सकाळी ८.०३ वाजता धरणी कंप झाल्याची चर्चा

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार;  २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेला प्रारंभ

ताज्या घडामोडी

शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्याकडून येडेश्वरी यात्रेत महा अन्नदान

April 3, 2026

कामगारच निघाला दरोडेखोर; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ आरोपी जेरबंद

April 1, 2026

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

March 29, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group