प्रतिनिधी / तुळजापूर
सरकारी अभियोक्ता पदावर निवड झाल्याबद्दल ऍड. अमित रोकडे यांचा सत्कार रिपाइं रोजगार आघाडीच्या वतीने तुळजापूरातील शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामान्य परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून शासकीय अभियोक्ता पदापर्यंत यश मिळविलेल्या ऍड. रोकडे यांचे कौतुक करण्यासाठी रिपाइं रोजगार आघाडीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मारूती मुंढे तर सामाजिक कार्यकर्त्या व महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनियुकत सरकारी वकिल ऍड. अमित रोकडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधवराव कुतवळ, तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवार, जुबेर शेख, स्वराज्य सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, बामसेफचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. सुर्यकांत गायकवाड, मुख्याध्यापक राजन जोगदंड, राष्ट्रवादीचे तुळजापूर शहराध्यक्ष बंटी गंगणे, आपसिंगा ग्रां .पं. सदस्य, सुशांत रोकडे, बहुजन स्वाभिमान संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष यशपाल सिरसठ, राष्ट्रवादीचे वाहेदभाई शेख, राम थोरात, अहमद अन्सारी, बहुजन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष शरद मस्के, शहाजी कदम, जयाजी सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे, के.टी.सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब शितोळे यांनी केले होते. यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे व बहुजन स्वाभिमान संघटना आणि विविध संघटना, राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते उपस्थित होते.