• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, May 18, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तिच्या आयुष्याची डबल बेल!

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 9, 2023
in महिला विश्व
0
0
SHARES
61
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

भाग्यश्री मुळे, नाशिक

  • मी लोणी जवळील सोनगावची. लहानपणापासून खूप संघर्ष करून शिक्षण पूर्ण केलं. कित्येक किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. घरची परिस्थिती बिकट. त्यामुळे चांगलं शिकून मोठं व्हायचं, स्वत:च्या पायावर उभं राहायचं हे तर लहानपणापासून ठरवलं होतं. कळायला लागलं तसं नर्स होऊन रुग्णांची सेवा करायची हे स्वप्न होतं, त्यासाठी विज्ञान शाखाही घेतली होती. पण नियतीच्या योजना वेगळ्याच असतात. १२ वी पूर्ण होताच वडलांनी लग्न करून दिलं. लग्न होऊन जुन्नरला आले. सासरची परिस्थिती देखील साधारणच होती. पती तेव्हा मिलमध्ये काम करत होते. घरी बसायचं नाही, काहीतरी करायचं हे मनाशी नक्की होतं. कॉलेज दूर असल्याने आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे बाहेरूनच पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. याशिवाय मुलांचे क्लास घे, बँकेचे कलेक्शन कर अशी काहीबाही कामे मी करू लागले. मिलमधले काम सुटल्यावर नवऱ्याने भाजीविक्रीचा व्यवसाय सुरु केला. मीही मदत करायचे. त्याच दरम्यान २०११ मध्ये एसटीत महिला कंडक्टरसाठी जाहिरात वाचनात आली. आम्ही दोघी जावांनी सोबतच अर्ज केला. सुदैवाने दोघीनांही बोलावणं आलं. इंटरव्यूला गेलो. लेखी, मौखिक परीक्षेत दोघीही उत्तीर्ण झालो. एकत्रच पुणे डीव्हीजन ऑफिसला प्रशिक्षणाला गेलो. प्रशिक्षण पूर्ण झालं. नोकरी सुरु झाली. आज एसटी बरोबरच्या या प्रवासाला १२ वर्ष पूर्ण झाली. नोकरीआधी पुणे जिल्ह्याच्या बाहेर फारशी न पडलेली मी आज नोकरीच्या निमित्ताने सगळा महाराष्ट्र फिरले आहे. या प्रवासात खूप शिकायला मिळालं. अनुभवाची मोठी शिदोरी मिळाली असून ती पुढे आयुष्यभर साथ देत राहील याचा आनंद आणि अभिमान वाटतो. या भावना आहेत नारायणगाव डेपोच्या महिला कंडक्टर लता डोके यांच्या. एसटीने त्यांना आणि त्यांच्या संसाराला गती दिली, स्थैर्य दिलं, आर्थिक पाठबळ दिलं, अनुभवाचा मोठा खजिना उघडून दिला त्यामुळे एसटीचे कायम ऋणी राहू अशा शब्दात त्या आपली कृतज्ञता व्यक्त करतात.
  • एक महिन्याच्या ट्रेनिंगनंतर लता यांना जुन्नर राजूर रुटवर पहिली फेरी करावी लागली. त्या दिवशी गणवेश घालून बसमध्ये चढल्यावर धाकधूक वाटत होती मात्र दिवस संपल्यावर सगळं काही व्यवस्थित पार पडल्याने समाधान वाटले असं त्या सांगतात. त्या नंतर रोज डेपोत आल्यावर कोणत्याही बससाठी ड्युटी लागायची. लता यांनी जुन्नर ते बारामती, औरंगाबाद, मुंबई, सोलापूर, बार्शी, महाबळेश्वर अशा अनेक ठिकांणाच्या ड्यूटी केल्या. आजही तेच रुटीन आहे. याशिवाय गरेज पडेल तसे ऑफिस कामही केले. या प्रवासात भर रस्त्यात गाड्या बंद पडणे, ड्युटी संपवून घरी यायला उशीर होणे या गोष्टी अनेकदा झाल्याचे त्या सांगतात. पण सहकारी खूप मदत करतात हेही त्या आवर्जून सांगतात. कंडक्टर म्हणून काम करताना ‘जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ’ ठेवून काम करावं लागतं. त्यामुळे मग सुट्ट्या पैशांसाठी वाद घालणारे प्रवासी, प्रवासात शुल्लक गोष्टींवरून गोंधळ घालणारे विविध वयोगटातले प्रवासी यांच्याशी सामना करताना सुवर्णमध्य साधता येतो हे त्या नमूद करतात. बरेचदा वाढत्या रहदारीमुळे बस निर्धारित वेळेपेक्षा अंतिम ठिकाणी उशीरा पोहोचते. अशावेळी ड्युटी संपवून घरी परतणे अशक्य असते. लता यांना मग नारायणगाव डेपोतच मुक्काम करावा लागतो. सुदैवाने येथे महिलांसाठी स्वतंत्र व सोयीयुक्त असा विश्रांती कक्ष आहे. रात्रीचा मुक्काम करून पुन्हा सकाळी त्या ड्युटीवर जॉईन होतात. दुपारी ड्युटी संपवून मग घरी जातात. पण लांबपल्ल्याच्या अनेक ठिकाणांवर मुक्कामाची सोय नाही. अगदी महाबळेश्वर, बारामती, बार्शी अशा ठिकाणी देखील महिला कंडक्टरसाठी मुक्कामाची सोय नाही. तिथं गैरसोयीचा सामना करावा लागतो अशी खंत त्या व्यक्त करतात. १२ वर्षात अपघात वगैरेचा अनुभव आला नाही याविषयी त्या समाधान व्यक्त करतात.
  • लता यांना एक मुलगा, एक मुलगी. आज दोघेही इंजिनिअर झाले असून आपल्या कष्टाचं मुलांनी चीज केल्याचा आनंद वाटतो असं त्या म्हणतात. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाश्यांच्या वृत्तीत, व्यक्त होण्याच्या पद्धतीत जमीन आसमानचा फरक अनुभवायला येतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहर ग्रामीण भागात, जवळ किंवा लांब पल्ल्याचे प्रवास करताना कधी या टोकाचे तर कधी अगदी विरुद्ध टोकाचे अनुभव येतात. मात्र प्रशिक्षणाच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रवाशांशी संयमाने वागतो, त्यांचा आणि आमचा प्रवास सुखाचा होण्यावर भर देतो हे देखील लता यांनी अधोरेखित केले.

SendShareTweet
Previous Post

तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात केलेली दहापट दरवाढ स्थगित; पुजाऱ्यांच्या विरोधानंतर प्रशासनाची माघार

Next Post

मराठ्यांची वज्रमूठ! 17 जुलैला हजारोंच्या संख्येने समाजबांधव मुंबईत आझाद मैदानावर एकत्र येणार

Related Posts

रेकॉर्डब्रेक गर्दी; लाडके भावोजी आदेश बांदेकरांच्या उपस्थितीत खेळ मांडियेला कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद

January 21, 2024

महानगराच्या धर्तीवर धाराशिवचा हिरकणी महोत्सव; महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री तटकरेंकडून अर्चनाताई पाटील यांचे कौतुक

January 7, 2024

सौंदणा अंबा येथे उभारणार बालसंस्कार केंद्र, वर्षा फाउंडेशनचा पुढाकार

September 21, 2023

पर्याय संस्थेच्या वतीने 300 एकल महिलांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप; पन्नालाल सुराणा म्हणाले, एकल महिलांसाठी काळ कठीण

August 26, 2023

मांडव्याची सून पूनम राजपूत-गहेरवार बनल्या सरकारी अभियोक्ता; गावकऱ्यांकडून सन्मान,प्रतिकूल परिस्थितीत घेतले शिक्षण

August 17, 2023

गावातून पहिल्यांदाच लेकीने मिळवले एमपीएससी परीक्षेत यश; गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला

July 16, 2023
Next Post

मराठ्यांची वज्रमूठ! 17 जुलैला हजारोंच्या संख्येने समाजबांधव मुंबईत आझाद मैदानावर एकत्र येणार

ऐतिहासिक सोहळा; नारी शक्तीच्या ताब्यात रोटरीची सूत्रं, पदग्रहण समारंभ थाटात, अध्यक्षा डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ.मीना जिंतूरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group