प्रतिनिधी / धाराशिव
येथील जय बजरंग क्रिकेट क्लब व रिर्पोर्टस क्रिकेट क्लब यांच्या वतीने जय बजरंग प्रिमियर लिगच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये सिंहगड संघाने पहिला क्रमांक पटकावित चषक आपल्या नावे केला, या स्पर्धेचे बक्षिस वितरण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दुसरा क्रमांक रायगड व तिसरा क्रमांक प्रतापगड संघाने पटकाविला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, महेश पोतदार, शाम जहागिरदार, विशाल पवार, पवन सुर्यवंशी, शिवाजी जहागिरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत आठ संघाचा समावेश होता. संघाना राज्यातील गडाचे नाव देण्यात आली होती, संघमालकांनी खेळाडु घेत सर्व संघामध्ये तुल्यबळ खेळाडु मिळाल्याने लढती सुध्दा रंगतदार झाल्या. साखळी पध्दतीने झालेल्या सामन्यामध्ये उपांत्यफेरीमध्ये चार संघानी झेप घेतली, त्यामध्ये सिंहगड, रायगड, प्रतापगड व शिवनेरी या संघाचा समावेश होता. त्यापैकी अंतिम फेरीमध्ये रायगड व सिंहगड संघामध्ये लढत झाली, चुरशीने झालेल्या सामन्यात सिंहगड संघाने विजय प्राप्त केला. विजयी संघाना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडु म्हणुन विकास पवार याला तर उत्कृष्ट फलंदाज म्हणुन अॅड.जावेद शेख व उत्कृष्ट गोलंदाज आशिष मायाचारी यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणुन महमंद तांबोळी यास बक्षिस देण्यात आले.या स्पर्धेच समालोचन जुन्नरभूषण मनोज बेल्हेकर यानी केले. स्पर्धा डॉ. सचिन देशमुख, प्रशांत पाटील, शाम जाधव, सुधीर सस्ते, विक्रम पाटील, अमरसिंह पाटील, आशिष मोदानी,धनाजी आनंदे, शेखर घोडके, लक्ष्मण मुंडे, प्रदिप घोणे यांच्या सहकार्याने पार पडल्या.