अमोलसिंह चंदेल| शिराढोण
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी 100 वर्षापुर्वीपासून गणपती मंदीर अस्तीत्वात असून, या दरवर्षी ग्रामस्थांतर्फे सार्वजनीक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. तेरा वर्षापुर्वी या मंदीराचा लोकसहभागातून जिर्णोध्दार कण्यात आला. यावर्षीही मंदीरात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून, दररोज गणरायाचे विधीवत पुजन केले जाते.
शिराढोण येथे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी 100 वर्षापुर्वीपासून गणपती मंदीर आहे. 2010 मध्ये गावातील युवकांनी तसेच नागरिकांनी या मंदीराचा कायापालट करण्याच्या उद्देशाने गावातील नागरिकांची बैठक घेतली. या बैठकीत मंदीराच्या जिर्णोध्दाराबाबत चर्चा केली . यामध्ये गावातील सर्व भाविक भक्तांना लोकवर्गणीसाठी अवाहन करण्यात आले. गणेशोत्सव, अखंड हरीनाम सप्ताह या माध्यमातून गाव व परीसरातील नागरिकांनी लोकवर्गणीसाठी प्रतिसाद दिला. पहिल्या टप्यात या मंदीरासाठी 6 लाख रुपये वर्गणी जमा झाली. या वर्गणीतून मंदीराचे काॅलम तसेच त्यावरी स्लॅब तयार करण्यात आला. त्यानंतर मंदीर सुशोभीकरण तसेच कलश यासाठी 14 लाख रुपये वर्गणी जमा झाली. एकूण 20 लाख रुपये मंदीरासाठी भाविक तसेच नागरिकांनी लोकवर्गणी दिली. या माध्यमातून या मंदीराचा कायापालट झाला. या मंदीरात 100 वर्षा पुर्वीची एक दगडी गणपतीची मुर्ती आहे. कलशारोहण सोहळयादरम्यान या जुन्या एैतीहासीक मुर्ती शेजारीच पंढरपुर येथून एक मार्बलची मुर्ती लोकवर्गणीतून आणुन त्याची स्थापना करण्यात आली. शिराढोण व परीसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदीरात दररोज विधीवत पुजा व गणपतीची आरती केली जाते.
मातीच्या एका खोली मध्ये होते मंदीर
शिराढोण येथील वयोवृध्द नागरिक सांगतात, 1950 सालापूर्वी पासून हे मंदीर मातीच्या एका खोलीमध्ये अस्तीत्वात होते. या खोलीत दगडी श्री गणेशाची मुर्ती हेाती. त्यावेळीही गाव व परिसरातील श्रध्दास्थान म्हणून या मंदीराची ओळख आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव
दर वर्षी या मंदीरात सार्वजनीक गणेश मंडळ या नावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गावातील या मंडळातील युवा कार्यकर्त्यांनी मिळून गणेशोत्सव काळात गणेशमुर्तीची स्थापना करतात. कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागता या मंडळातील सदस्य स्वखर्चाने हा उत्सव सार्वजनीक पध्दतीने साजरा करतात.
मंदीर देखभालीसाठी पुजारी
या मंदीराची देखभाल करण्यासाठी गावातील रामभाउ वेदपाठक हे पुजारी म्हणून योगदान देतात. या मंदीराची स्वच्छता तसेच नित्यपुजा मागील तेरा वर्षापसून वेदपाठक हे मनोभावे करतात.