आरंभ मराठी / धाराशिव
केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या मागणीसाठी धाराशिव शहरातील पोलिस ठण्याच्या समोरील पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांवर 302 तसेच मोक्का अंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत टाकीवरून खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.
मस्सा जोग येथील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या संदर्भात देशमुख कुटुंबीयांना माहिती दिली जात नाही तसेच या प्रकरणातील काही दोषींवर 302 तसेच मोकका लावला जात नाही,अशी तक्रार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली असून,त्यांनी आज मस्साजोग येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी हस्तक्षेप करून धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरवले.
देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, असा इशारा देत धाराशिव येथील तरुणांनी अचानकपणे आंदोलन सुरू केले आहे. हे तरुण धाराशिव शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून बसले आहेत.विशेष म्हणजे ही टाकी शहर पोलीस ठाण्यासमोर आहे.
त्यामुळे पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.