• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, October 9, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Rain Fall News आता 10 दिवस पावसाचा खंड, 20 ऑगस्टपर्यंत पाऊस गायब

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 10, 2024
in Breaking
0
0
SHARES
664
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले. मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने देखील दमदार हजेरी लावली. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. जून महिन्यात राज्यात पावसाचा जोर कमी असला तरी धाराशिव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. जुलै महिन्यात तर 31 दिवसापैकी 25 दिवस दररोज कमी अधिक पाऊस झाला.

जुलै महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील काही छोटे प्रकल्प भरले. जुलै महिन्यात झालेल्या अधिकच्या पावसामुळे हलक्या जमिनीतील पिके पिवळी पडून वाया गेली आहेत. ऑगस्ट महिन्याची सुरुवातही पावसाने झाली. परंतु आता भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज जाहीर केला आहे.

ऑगस्ट महिन्यात धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पुढचे दहा दिवस म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. या काळात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. सध्या सोयाबीन हे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात सोयाबीन पिकाला ऊन आणि पाऊस दोन्हीची गरज असते. गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. पावसाचे ढग गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. शेंगा भरण्याच्या काळातच पावसात मोठा खंड पडला तर सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार पुढचे दहा दिवस म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत पावसाचा खंड असेल परंतु या काळात काही भागात हलका पाऊस पडू शकतो.

20 ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड

महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहील असा अंदाज आपण या पूर्वीच दिला होता. मान्सून चा आस असलेला पट्टा उत्तरेला सरकला आहे. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी कोणतीच प्रणाली विकसित होण्याचा अंदाज नाही. या सर्व घटकांचा विचार केला असता ऑगस्ट महिन्यात 20 तारखेपर्यंत पावसाचा खंड राहील असा प्राथमिक अंदाज आहे.
या काळात स्थानीक वातावरण निर्मिती झाली तर क्वचित् एखाद्या ठिकाणीं हलका पाऊस होऊ शकतो. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान केरळ किनारपट्टीच्या भागात एक कमी दाब निर्माण होईल असा प्राथमिक अंदाज आहे. हा कमी दाब पश्चिम दिशेला ओमान या देशाकडे जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. 22 ऑगस्ट च्या दरम्यान एक कमी दाब बंगालच्या उपसागरात निर्माण होईल व तो विशाखा पटनम मार्गे महाराष्ट्रात पाऊस देईल असा अंदाज आहे.

सुरज जयपाल जाधव,

हवामान अभ्यासक
रुईभर धाराशिव.

Tags: #environment #news #Maharashtra #dharashiv #osmanabad
SendShareTweet
Previous Post

यलगट्टेंना भारी ठरल्या फड बाई; कामे न करताच कामांची बिले काढली, शासनाने मागवला अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांना सचिवांचे पत्र

Next Post

शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या; सोयाबीन, कापूस उत्पादकांना मिळणार हेक्टरी पाच हजारांचे अनुदान

Related Posts

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

October 2, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Next Post

शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या; सोयाबीन, कापूस उत्पादकांना मिळणार हेक्टरी पाच हजारांचे अनुदान

Crop's Insurance सकारात्मक निर्णयाची अपेक्षा; 2023 च्या पीक विम्यासाठी 15 ऑगस्टनंतर दिल्लीत बैठक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026
तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group