• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Good news गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारीपर्यंत मिळणार, बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सहमती

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 9, 2024
in कृषी
0
0
SHARES
718
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार कैलास पाटील यांची माहिती, कृषी आयुक्तांच्या भेटीनंतर प्रक्रिया गतिमान

प्रतिनिधी / धाराशिव

२०२२ सालच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतीपिकांचे नुकसान झाले होते. मात्र, विमा कंपनीने भारांकनाचा निकष चुकीच्या पद्धतीने लावत ५० टक्केच भरपाई दिली. आमदार कैलास पाटील यांनी याबाबत विभागीय समितीकडे तक्रार केली होती तसेच गेल्या आठवड्यात कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन विम्याची रक्कम मिळवून देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २५ जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील,असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

गेल्यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या १ लाख ३४ हजारांवर शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना अपात्र ठरविल्या. याबाबत आमदार कैलास पाटील यांनी विभागीय समितीकडे स्वत: तक्रार केली होती. या समितीने संपूर्ण भरपाई तसेच पूर्वसूचनांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देतानाच पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. पुढे राज्य तांत्रिक सल्लागार समितीनेही हेच आदेश दिले. परंतु, कंपनी हे आदेश पाळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुलीच्या तीन नोटिसा दिल्या.

इतके होवूनही कंपनी दाद देत नसल्याने आमदार पाटील यांनी ३ जानेवारी रोजी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची पुणे येथे भेट घेतली होती व या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रलंबित २९४ कोटी रुपये मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

डॉ. प्रविण गेडाम यांनी यात लक्ष घातल्याने आठ दिवसातच याला गती मिळाली असून, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यास कंपनी तयार असल्याचे लेखी पत्र दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी २५ जानेवारी पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश विमा कंपनीस निर्गमित केले आहेत. त्यामुळे २०२२ मधील प्रलंबित विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही विमा रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत आपला विमा कंपनी व प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील,असे आमदार पाटील यांनी सांगितले.

SendShareTweet
Previous Post

व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, कळंब शहरात कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Next Post

उद्या वेळा अमावस्या, लगबग सुरू, शेतात सजणार हिरवाईचा अपूर्व सोहळा, बाजारात भाज्यांची रेलचेल

Related Posts

‘त्या’ बातम्या खोट्या, सोयाबीन खरदीला मुदतवाढ नाहीच !

February 11, 2025

Devendra fadanvis शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका..

December 7, 2024

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची लूट; आद्रतेचा निकष लागू होईना,केवळ 13 हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

November 30, 2024

शेतकऱ्यांना हक्काचा 294 कोटींचा पीक विमा मिळवून द्या; आमदार कैलास पाटलांनी घेतली कृषी आयुक्तांची भेट

January 3, 2024

375 कोटींच्या पीक विम्यासंदर्भात जानेवारीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

December 29, 2023

नळदुर्गमध्ये स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती करा

December 21, 2023
Next Post

उद्या वेळा अमावस्या, लगबग सुरू, शेतात सजणार हिरवाईचा अपूर्व सोहळा, बाजारात भाज्यांची रेलचेल

आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिलोत का, पत्रकारांनी स्वतःला विचारून पहावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group