आरंभ मराठी / पाटण
पाटण येथे रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार केल्या प्रकरणी तीनजणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार रानडुक्कर या वन्य प्राण्याची शिकार करून पाटण येथे आणले असल्याची कळताच वन विभागाने छापा टाकून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी नारायण शिवाजी पवार वय (४5 वर्ष), उत्तम रामू पवार (६०, दोघे रा.म्हावशी ता.पाटण जि सातारा), पंढरीनाथ यशवंत पाटील (५४ रा.येरफळे ता.पाटण) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपवनसंरक्षक सातारा श्रीमती आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पाटण राजेश नलवडे , वनपाल पाटण निलेश कुंभार, वनरक्षक पाटण निखिल कदम, वनरक्षक मोरगिरी रोहित लोहार, वनरक्षक पाचगणी विलास वाघमारे, वनरक्षक बहुले मेघराज नवले, वनरक्षक गोवारे राम मोटे कायम वनमजूर संजय जाधव यांनी केली.