प्रतिनिधी / धाराशिव
घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा, हे ब्रीद घेऊन देशभरातील खेळाडूंसाठी नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या चषकच्या लोगोचे अनावरण भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने आ. राणाजगजितसिंह पाटील व भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या हस्ते धाराशिव- कळंब व तुळजापूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आले. तसेच नमो चषकातील विविध क्रिडा व सांस्कतीक स्पर्धेच्या नोंदणीस सुरूवात करण्यात आली.
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील भूम-परंडा-वाशी, कळंब-धाराशिव, तुळजापूर, उमरगा-लोहारा या विधानसभा क्षेत्रामध्ये गाव पातळीपासून क्रिकेट, फुटबॉल, बुध्दीबळ, कॅरम, कबड्डी, खो-खो, कुस्ती, धावणे, व्हॉलीबॉल, चित्रकला, रांगोळी, गीत गायन, वकृत्व स्पर्धा अशा विविध क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांची नोंदणी २९/१२/२०२३ ते १०/०१/२०२४ पर्यत असणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरूवात १२ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ पर्यत कार्यक्रम होणार आहे तर २७ जानेवारी रोजी बक्षीस वितरण होणार आहे. लोगो अनावरण प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, लोकसभा निवडणुक प्रमुख नितीन काळे, अशोक शिंदे, विजय चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित कव्हेकर-पाटील, नेताजी पाटील, अस्मिता कांबळे, प्र.का.स विनोद गपाट, प्रविण पाठक, सतीश देशमुख, सरचिटणीस, इंद्रजित देवकते, प्रदीप शिंदे, मंडळाध्यक्ष अजित पिंगळे, राजाभाऊ पाटील, अभय इंगळे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी सर्व खेळाडुंना या धाराशिव जिल्ह्यातील नमो चषकामधील विविध क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.