जहीर इनामदार / नळदुर्ग
राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश यांना ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्याची भूरळ पडली. त्यांनी किल्ल्याचे प्रवेशद्वार, बांधकाम, ऐतिहासिक वस्तू, तोफांची पाहणी करून आनंद व्यक्त केला. त्यांनी किल्ल्यातील बोरी नदीतील बोटीत बसून सफर केली.
अप्पर पोलीस महासंचालक धाराशिव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या कामकाज पाहणी दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचा कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
दरम्यान पोलिस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश यांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यास भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली.
त्यांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यास भेट देऊन किल्ल्यातील विविध स्थळांची पाहणी केली. श्री. प्रकाश यांचे युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी यांनी स्वागत केले. यावेळी किल्ल्यातील युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी, जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी, जयभिम वाघमारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
वास्तूबद्दल आकर्षण
किल्ल्यातील हुलमुख दरवाजा, बारादरी,उपली बुरुज, पाणीमहाल, नऊ बुरुजसह आदी प्रेक्षणीय स्थळांची व जुनं मुंसिफ कोर्टमधील खास पंचधातू तोफ व इतर ठिकाणी असलेल्या तोफांची त्यांनी पाहणी केली.युनिटी कंपनीतर्फे सुरु असलेल्या बोरी नदीत बोटिंग करून आनंद लुटला.दरम्यान युनिटी मल्टिकॉन कंपनीतर्फे किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध केलेल्या सोयीसुविधाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन, तुळजापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, उमरग्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रमेश बरकते,नळदुर्ग ठाण्याचे सहपोनि लोखंडे व उमरगा, मुरूम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.