प्रणिता राठोड | धाराशिव
मान्सूनची सुरुवात जुनच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित होते. परंतु यंदा पंधरा जून उलटून गेला तरी पावसाने हजेरी लावली नव्हती. गेल्या आठवडाभर शहरात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. परंतू पाऊस काही पडत नव्हता. महिनाभरापासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांची पावसाची प्रतीक्षा अखेर संपली आणि धाराशिव शहरात सोमवारी दुपारी वेगवेगळ्या भागात दुपारच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आणि गेल्या काही दिवसापासून उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरण आल्हादायक झाले असून तापमानाचा पारा 40 अंशावरुन वरून 27 अंशा पर्यंत घसरला. दरम्यान पावसाला जरी सुरवात झाली असली तरी बळीराजा अजूनही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहे.