• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अंगाची होतेय लाही लाही,निसर्गा रे तुला दया का येत नाही..!

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 28, 2023
in Uncategorized, पर्यटन
0
0
SHARES
202
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

मुक्या प्राण्यांचा जीव होतोय कासावीस,

रामलिंग परिसरात माकडांना बिसलरीच्या पाण्याचा मोह

संकलन; आनंद वीर, छायाचित्र; गोपाळ लवटे

पावसाने पाठ फिरवली आणि इथल्या बळीराजाचा जीव कासावीस झाला आहे. महिन्यापासून खरीप पिकांना पावसाची आस लागली आहे. अशा परिस्थितीत पाऊस लांबणीवर पडत आहे. परिणामी पिके करपत आहेत तर पाण्याचे स्रोत आटत असल्याने मुक्या जीवांचा घसा कोरडा पडत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील श्रीक्षेत्र रामलिंग परिसरातील उपरोक्त छायाचित्र मनाला चटका लावणारं आणि निसर्गाला साद घालणारं आहे.

त्याचं झालं असं की, नेहमीप्रमाणे येडशी येथील निसर्गमित्र श्री गोपाळ लवटे आणि पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर बेद्रे हे रामलिंगला दर्शनासाठी निघाले होते.
पावसाळ्यात देखील रखरखणाऱ्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. चालून थकवा जाणवल्यावर या दोन मित्रांना तहान लागली. त्यांनी लागलीच पाण्याची बाटली विकत घेतली. पायऱ्यांवरून खाली उतरत उतरत विसावा घेत त्यांनी पाणी पिण्यास सुरुवात केली. पण नेमकं त्याचवेळी एक दोन वानरराज अवतीभवती घुटमळत होते. नेहमीप्रमाणे त्यांना वाटलं की ही माकडे खाऊसाठी शोधमोहीमेवर आहेत. पण पाहिल्यावर लक्षात आलं की, या माकडांना तहान लागली आहे आणि ती व्याकुळ नजरेने पाण्याच्या बाटलीकडे पाहत आहेत. लवटे आणि बेद्रे या दोन्ही मित्रांनी लागलीच पाणी बाटली माकडांकडे सुपूर्द केली. माकडांनी मनसोक्तपणे बाटलीतील पाण्याचे सेवन केले. पाण्याचा शेवटचा थेंब संपेपर्यंत बाटली सोडली नाही. नेमका यावेळी गोपाळ लवटे यांनी हा भावणारा प्रसंग कॅमेऱ्यात टिपला. तसेच शक्य त्या क्षमतेनुसार माकडांना खाऊ देखील दिला.


घटना सांगण्याच तात्पर्य हे की कमी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा पाण्याचे प्रवाह खळखळत नाहीत. जलसाठ्यांमध्ये दरवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा दिसून येतो आहे. भर पावसाळ्यात ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या काळात या निष्पाप जीवांच काय होईल,या भीतीने काळजात धस्स होतं..
रामलिंग अभयारण्य परिसरात शेकडो माकडांसह, मोर, विविध जातीच्या चिमण्या, ससे कोल्हे, तरस, हरणे यासह अनेक प्रकारच्या पशू पक्षांचा अधिवास आहे.


मुक्या जीवांना अन्नपाणी सेवाभाव देणारी व्यवस्था भेटेल का हा मोठा प्रश्न आहे. निसर्गा आता तू तरी निष्ठुर होऊ नकोस. या मुक्या जीवांची तरी दया येऊ दे.आणि मनसोक्त बरस.

आता होऊ दे आबादानी..

SendShareTweet
Previous Post

चिंताजनक; अल्पवयीन मुलांकडून नशेसाठी स्टिकफास्टचा वापर, तणाव, नैराश्य वाढले, मानसोपचार तज्ञ म्हणतात, समुपदेशनाची गरज

Next Post

देवदर्शनासाठी कर्नाटकात गेलेल्या भाविकांच्या रिक्षाला ट्रकची धडक; अपघातात उमरग्यातील तीन, तुळजापुरातील एकजण ठार

Related Posts

आनंदवार्ता! धाराशिव जिल्ह्यात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन

May 11, 2025

तुळजापुरात छत्रपतींनी २६५ वर्षांपूर्वी केली होती दारूबंदी: राजकारण्यांनो, आदर्श घ्या, व्यसनाधीनता संपवण्यासाठी एकजूट दाखवा –

April 16, 2025

जिल्हाधिकारी कीर्ती कुमार रात्री साडेआठ वाजता जिल्हा रुग्णालयात..

March 5, 2025

ड्रग्ज प्रकरणात तक्रारी करणाऱ्यांनाच पोलिसांच्या धमक्या..पालकमंत्र्यांनी थेट एस एसपींना दिला सज्जड इशारा

February 20, 2025

नेम चुकला, वाघाने पुन्हा दिला चकवा

February 12, 2025

बिबट्या धाराशिव शहराजवळ..घाटंग्री शिवारात बैलावर हल्ला

January 6, 2025
Next Post

देवदर्शनासाठी कर्नाटकात गेलेल्या भाविकांच्या रिक्षाला ट्रकची धडक; अपघातात उमरग्यातील तीन, तुळजापुरातील एकजण ठार

संकटाची छाया गडद; आर्थिक व्यवहार मंदावले, पावसाअभावी जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट, पाऊस न झाल्यास बैलपोळ्यावरही सावट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group