प्रतिनिधी / नळदुर्ग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी (१) रोजी सकाळी ११ वाजता किल्ला गेट पासून ते बसस्थानक पर्यंत विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने नळदुर्गला तालुक्याचा दर्जा द्या, तूर्तास प्रस्तावित असलेले अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करा,नळदुर्ग येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर करून कार्यान्वित करा आदी मागण्या करण्यात आल्या.
मनसेने म्हटले आहे की, नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त पदांची भरती करावी, नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती करून पूर्ववत सुरू करावे, शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या प्रस्तावित योजनेस मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया सुरू करावी. मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने किल्ला गेट,क्रांती चौक,चावडी चौक,भवानी चौक,शास्त्री चौक,मार्गे बसस्थानकपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाला मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी संबोधित केले.त्यांनी विविध मागण्याचा पाठपुरावा कसा केला, याबाबत माहिती दिली व प्रशासनाकडून मिळालेले पत्र मोर्चात वाचून दाखवले. यावेळी प्रमोद कुलकर्णी यांनी भाजपा व सरकारवर सडकून टीका करत प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाचे काय झाले, हा प्रश्न केला. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव व जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार यांनी सरकार व प्रशासनाला आज शांततेत मोर्चा काढत आहोत. यानंतरही आमच्याकडून शांततेच्या मार्गाची अपेक्षा न करता येत्या दोन महिन्यात या मागण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा,अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. याप्रसंगी उमरगा तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव,नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंखे,तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,लोहार तालुकाध्यक्ष अतुल जाधव,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे,नळदुर्ग शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, शहर संघटक रवि राठोड, मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,तालुका उपाध्यक्ष गणेश बिराजदार, मनविसे तुळजापूर शहराध्यक्ष ऋषी माने, आकाश पवार, मनविसे नळदुर्ग शहराध्यक्ष निखिल येडगे,शिरीष डुकरे,दिलीप शंकरशेट्टी,आकाश पटणे,करण सगर,सुरज साखरे, वैभव स्वामी, अजय डांबरे, सोमेश्वर आलूरे,ओंकार कबाडे,महादेव शिंदे,कलीम शेख, यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोर्चाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत दिले. निवेदन मंडळ अधिकारी यांनी स्वीकारले.