आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केले असून, 8 पालिकेत सरासरी 68.97 टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्व आठ नगरपालिकांमध्ये मतदान शांततेत पार पडले.
जिल्ह्यात सर्वाधिक मतदान तुळजापूर नगरपालिकेत नोंदले गेले असून येथे तब्बल 80.28% मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यानंतर भूममध्ये 79.21%, परंड्यात 78.13%, नळदुर्गमध्ये 73.17%, कळंबमध्ये 72.69%, मुरूममध्ये 67.41%, उमरगा नगरपालिकेत 66.81% मतदान झाले.
धाराशिव नगरपालिकेत मात्र तुलनेने कमी, म्हणजे 61.15% मतदानाची नोंद झाली.धाराशिव शहरात निराशाजनक स्थिती दिसून आली.
जिल्हाभर उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग लक्षवेधी ठरला असून आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.








