• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 6, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकजूट, अवघ्या काही तासांत सुरू होणार धाराशिवची विराट शांतता रॅली

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 10, 2024
in Breaking
0
0
SHARES
477
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


मनोज जरांगे पाटील लातूरहून निघाले, धाराशिव शहरात भव्य तयारी,


शहरातील वाहतूक मार्गात बदल, मराठा आरक्षणासाठी जागृती शांतता रॅली

आरंभ मराठी / धाराशिव

मराठा सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी तसेच मराठा आंदोलानादरम्यान राज्यात मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, यासह विविध मागण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्राभर जनजागृती आणि शांतता रॅली सुरू झाली आहे.आज धाराशिव शहरातून भव्य शांतता रॅली काढण्यात येणार असून, त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. मंगळवारी लातूर शहरात रॅली काढल्यानंतर मनोज पाटील यांनी रात्री लातूर जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. सकाळी ते धाराशिवच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही तासात धाराशिव शहरातून रॅलीला सुरुवात होईल. त्यासाठी सकाळपासूनच मराठा बांधव ग्रामीण भागातून प्रचंड मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत.

मराठा आरक्षणाची मागणी मार्गी लावण्यासाठी सरकारला १३ जुलैची दिलेली डेडलाइन सरकारने पाळावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी धाराशिव येथे मराठा योद्धे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता धाराशिव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातून ही रॅली सुरू होणार आहे.


मनोज जरांगे-पाटील यांचे सकाळी ११ वाजता लातूरहून धाराशिवमध्ये आगमन होईल. शांतता रॅलीची सुरुवात अहिल्यादेवी होळकर चौकातुन होईल. यावेळी समस्त  धनगर बांधवांच्या वतीने जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, धारासुर मर्दिनी, हजरत खाजा शमशुद्दीन गाझी दर्गा, विजय चौक, नेहरू चौक काळा मारुती चौक, संत गाडगेबाबा चौक अशी रॅली येईल. या रॅलीत गाडगे महाराज चौकापासून महिला भगिनी देखील सहभागी होऊन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीला मार्गदर्शन करणार आहेत.

शहरात सर्वत्र स्वागत कमानी, अल्पोपहार पाण्याची सोय

शहरात महत्वाच्या सर्व रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. मार्गात विविध जाती धर्माचे बांधव जरांगे पाटील यांचे स्वागत करणार आहेत. विशेष म्हणजे पार्किंग तसेच रॅली मार्गावर पाणी, अल्पोपाहाराचे स्टॉल्स राहणार आहेत. प्रत्येक ठिकाणी मदतीसाठी स्वयंसेवक असणार आहेत.




शहरातील वाहतूक मार्गात बदल –

या रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत आज सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. शहरात बेंबळी चौकातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश नसणार आहे. तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून, आर्य समाज चौकातून तसेच सांजा चौकातून शहरात येणाऱ्या वाहनांना 8 ते 4 दरम्यान प्रवेश बंद असणार आहे.

केलेल्या बदलाप्रमाणे अशी असेल वाहतूक व्यवस्था
1. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक, धाराशिव ते तुळजापूर / बेंबळी कडे जाणारी वाहतुक शांतीनिकेतन चौक वरुडा रोड ब्रीज मार्गे पुढे तुळजापूर व बेंबळी कडे पथक्रमण करतील.

2. तुळजापूर / बेंबळी ते धाराशिव शहराकडे येणारी वाहतुक फील्टर टाकी तुळजापूर रोडपासुन आयुर्वेदीक महाविद्यालय समोरील हायवे ब्रीज वरुन वरुडा रोड ब्रीज, शांतीनिकेतन चौक मार्गे धारशिव शहरात पथक्रमण करतील.

3. आर्य समाज चौक धाराशिव ते सांजाकडे जाणारी वाहतुक आर्य समाज चौक / जिजाऊ चौक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक शांतीनिकेतन चौक वरुडा रोड ब्रीज मार्गे पुढे सांजा कडे पथक्रमण करतील.

4. सांजा ते आर्य समाज चौक धाराशिव कडे येणारी वाहतुक एसबीआय बँक चौक सांजा रोड वरुडा रोड ब्रीज शांतीनिकेतन चौक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक मार्गे पुढे आर्य समाज चौक / जिजाऊ चौक कडे पथक्रमण करतील.
वाहतुकीत केलेले हे बदल  पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाहीत. सर्व नागरिकांनी वाहतुकीत केलेले बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

अशी आहे धाराशिवमधील पार्किंग व्यवस्था

1)बाजार समिती मैदान
2) हंबीरे पेट्रोल पम्प शेजारील मोकळी प्लॉटिंग
3) सरकारी दूध डेरी
4)बेंबळी रोड,
5) भारत विदयालय नवीन इमारत
6) भारत विद्यालय शाळा रोड,
7) सिद्धाई मंगल कार्यालय
8)अक्षता  मंगलकार्यालय

बार्शी रोड
1)मल्टी हायस्कूल
2) लेडीज क्लब
3) श्रीपतराव भोसले हायस्कूल
4)पुष्पक पार्क व परिमल मंगल कार्यालय
सेंट्रल बिल्डिंग शेजारील मशीद पुढे रस्ता बंद
1शेजारील पोलीस निवास मध्ये लावू शकता ऑफिस

तुळजापूर रोड

1)अयोध्या नगर,
2) तंत्रनिकेतन कॉलेज
3) भारत सदनिका
4)ग्रीन लँड स्कूल शेजारी मोकळी जागा

बांधवांनो नियमांचे पालन करा
या रॅली मध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव तसेच इतर समाजाचे बांधव सहभागी होणार आहेत. रॅलीमध्ये जागोजागी स्वयंसेवक मदतीसाठी तैनात असणार आहेत. रॅलीमध्ये कसलाही गोंधळ न घालता सहभागी व्हावे, रस्त्यावरून चालताना महिला, वृद्ध, बालके यांना जागा करून द्यावी. पोलीस बांधवांना सहकार्य करावे, अम्ब्युलन्ससाठी रस्ता मोकळा करून द्यावा, सर्व बांधवांनी शांततेत ही रॅली पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: maharashtra-cmo-bjp-shivsena-ncp-manoj-jarange-Patil-rally-in-dharashiv
SendShareTweet
Previous Post

समाजकारण,राजकारणाचा नवा आरंभ..वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज मेघ राणाजगजितसिंह पाटील करणार तेरणा युथ फाऊंडेशनची सुरुवात

Next Post

‘त्या’ मुलाची बनवेगिरी..14 वर्षीय मुलाने केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; क्रिकेटची अकॅडमी लावण्यास वडिलांचा विरोध असल्याने रागाने गेला होता निघून

Related Posts

Big Breaking पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या; ऑनलाइन रम्मीमध्ये पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

June 16, 2025

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

June 11, 2025

Breaking अनधिकृत खताचा 20 टन साठा जप्त; कृषी विभागाची मोठी कारवाई

May 16, 2025

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात मद्यधुंद पुजाऱ्याची दादागिरी, तहसीलदारांना शिवीगाळ,कार्यालयाची काच फोडली

May 14, 2025

बिबट्याची दहशत कायम; मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

May 5, 2025

धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटील पुन्हा भिडले

May 1, 2025
Next Post

'त्या' मुलाची बनवेगिरी..14 वर्षीय मुलाने केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; क्रिकेटची अकॅडमी लावण्यास वडिलांचा विरोध असल्याने रागाने गेला होता निघून

'आरंभ मराठी'च्या वृत्तानंतर आमदार राणा पाटील यांनी केली शहरातील रस्त्यांची पाहणी, अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भावी सरपंचाच्या स्वप्नांना ब्रेक ; ६२१ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पुन्हा होणार

July 5, 2025

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group