आयोजक सुधीर पाटील यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा
प्रतिनिधी/ धाराशिव
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव , जिल्हा तालीम संघ आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला धाराशिवकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून, प्रचंड थंडीतही प्रेक्षक वर्ग कुस्तीच्या मैदानात ठाण मांडून आहेत. या स्पर्धेत राज्यातील एकाहून एक सरस मल्ल सहभागी झाले आहेत. दरम्यान दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार उद्घाटन तुळजाभवानी स्टेडियमवरील गुरुवर्य के. टी .पाटील सर (बप्पा ) क्रीडा नगरीत संपन्न झाले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक सुधीर ( अण्णा ) पाटील यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला . स्पर्धेचे मुख्य कार्यवाहक युवा उद्योजक, युवा नेते अभिराम पाटील व महाराष्ट्र केसरी राहुल नाना आवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उद्घाटन सोहळ्याला अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, बाळासाहेब लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीच्या अजित पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगडे, शमशोदिन जमादार
, संजय पाटील
–दुधगावकर, प्रशांत फड, सुनील सांळ
खे ,शिवसेनेचे नेते अनिल खोचरे,
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील
, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, भाजपाओबीसी सेलचे उपाध्यक्ष भास्कर बोंदर, विकी चव्हाण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष विजय काका बराटे,
जय तुळजाभवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन संजय पाटील,जनता बँकेच्या संचालक आशिष
मोदाणी, ह.भ.प प्रकाश बोधले महाराज, द्राक्ष बागायतदार शेतकरी जयनाना देशमुख तसेच
आदी मान्यवर उपस्थित होते.
हे ठरले विजेते
संपन्न झालेल्या ६५ किलो वजनाच्या गादी (मॅट)गटात प्रथम सोनबा इंगळे ,कोल्हापूर तर द्वितीय क्रमांक अनिकेत मगर, सोलापूर तसेच तृतिय क्रमांकावर विनायक मोळे , वर्धा व केतन घारे यांनी स्थान पटकावले तर माती गटाच्या काही कुस्त्या शनिवारच्या सत्रात होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले .