दिनेश पाटील/ माडज
उमरगा तालुक्यातील भगतवाडी (नाईचाकूर ) येथील उंच डोंगरावर असलेल्या भगवती देवीची यात्रा वेळा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते. यावर्षी शुक्रवारी सकाळपासूनच भगवती देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पायथ्यापासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
तुळजाभवानीची धाकटी बहीण भक्तांना पावणारी देवी म्हणून भगवती देवीची ओळख आहे. महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पुरणपोळी नेवैद्याचा मान देवाच्या चरणी अर्पण करून आपला नवस फेडण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान आराध्याचा जागर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
डोंगराच्या पायथ्यापासून भक्त माळ-परडी घेऊन दोन्ही पायरी बाजूने जोगवा मागत होते. दुपारी छबीना निघाला. त्यानंतर भक्त आपल्या घराकडे परतले. दुपारी आमदार ज्ञानराज चौगुले,कृषीभुषण गोविंदराव पवार, वैभव पवार, जगदंबा देवी ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार, सचिव बी.के.पवार,सरपंच चंद्रकांत स्वामी आदींनी मातेचे दर्शन घेतले.यात्रेसाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.