प्रतिनिधी / कळंब
सर्वसामान्यांच्या विश्वासात एवढ्या कमी कालवधीमध्ये अधिराज्य गाजवणारी, अशी साई नागरी सहकारी पतसंस्थेने आपली ओळख निर्माण केली आहे.
साई नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व संचालकांना एक वर्षाची माहिती देण्यात आली.आजच्या काळात पतसंस्था चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.परंतू आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व आशीर्वादामुळे आपली पतसंस्था प्रथम वर्षात नफ्यात आहे,हे सांगताना मला आनंद होत आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने अधिक जोमाने काम करून आपली पतसंस्था कशी वाढेल याकडे प्राधान्याने लक्ष देऊ, यापुढे अधिक जोमाने काम करून आपल्या पतसंस्थेचा आलेख अधिकाधिक कसा वाढेल असा प्रयत्न करू. आजच्या काळात आपण साई नागरी पतसंस्थेवर विश्वास ठेवला याबद्दल आम्ही सर्व संचालक मंडळ आपले कायम ॠणी आहोत,असे चेअरमन सागर मुंडे म्हणाले. वर्धापन दिनी पतसंस्थेचा लेखाजोखा पाहून पतसंस्था वर्षअखेरीस नफ्यात असल्यामुळे सर्व संचालकांनी पतसंस्था चेअरमन सागर मुंडे यांचा सत्कार केला.
यावेळी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन शिशिर राजमाने,संचालक डॉ. सुनील थळकरी, शिवाजी लोखंडे, शितलकुमार भडंगे,अभिषेक मुंडे, विशाल जाधवर, संजय चिंचकर, शैलेश स्वामी,किरण जोशी,शिवहर गुजर, सुनिता मुंडे, स्वाती मुंडे तसेच निलेश होनराव, समीर मुंडे,ओंकार मुंडे, अविनाश खरडकर, पतसंस्था सचिव अभिजीत सगरे व मॅनेजर वाघमारे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.