प्रतिनिधी / कळंब
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. परिसरात यामुळे वृक्ष संपदा बहरून येणार आहे. झाडे लावून तसेच उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप करून ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम. रमेश यांचा बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्यासह सर्व संचालकाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल एम.रमेश यांनी आयोजकांचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी कळंबचे सहाय्यक निबंधक कळंब श्री. शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल श्रीराम मायंदे, उपजिल्हा प्रमुख प्रदीप मेटे, उपसभापती श्रीधर भवर, संचालक भारत सांगळे, संदीप मडके, कल्याण टेकाळे, हरिश्चंद्र कुंभार, लक्ष्मण कोल्हे, रोहन पारख, संचालक सुनीता शेळके, सुजाता वाघमारे, सचिव डी.डी.वाघ, महिला तालुका प्रमुख रुकसाना बागवान, माजी नगरसेवक हर्षद अंबुरे, सुरेश शिंदे, पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, तुषार वाघमारे, शशिकांत फाटक, आनंद बलाई, नंदकिशोर मोरे, गणेश लाखे, बप्पा कोरे, जनक जाधव,गोविंद चौधरी, रामेश्वर जमाले, भीमा हगारे, आत्माराम लकडे, अमृत जाधव, मोतीलाल काळे, अजय जाधव, विजय गुंजाळ, पवन सावंत, सादेक पठाण जावेद भाई सागर महाद्वार बाजार समितीचे कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.