प्रतिनिधी / इटकळ
इटकळ (ता. तुळजापूर) येथील धायफुले स्पिनींग मिल येथील ११ के.व्ही. ए जी फिडर इटकळ विविध गावातून जाते. धायफुले रोहीत्र इटकळ ए.जी फिडरवर असून,आहे.सोमवारी मध्यरात्री डीपीमधील आँईलची मध्यरात्री चोरी करण्यात आली.इटकळ धायफुले मिल परिसरातील शेतकर्यांच्या मोटारी चालू न झाल्याने इटकळ येथील लाईनमन काळे यांना शेतकर्यांनी कळवले असता लाईनमन काळे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
अज्ञात चोरट्यांनी डीपीमधील १०० लिटरपेक्षा अधिक आँईल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसून आले. या ऑईलची अंदाजे किंमत जवळपास १२ हजार रुपयाच्या जवळपास आहे. सोमवारी अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रपाळीत वीज बंद असताना डिपीमधील आँईल चोरी केले असून,याप्रकरणी अज्ञात चोराविरूद्ध नळदुर्ग पोलिस स्टेशन अंतर्गत इटकळ पोलिस चौकी येथे महावितरण कनिष्ठ अभियंता पी.आर.खापरे व इटकळ लाईनमन काळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इटकळ औट पोस्ट पोलिस स्टेशन हेड कॉन्स्टेबल गोरखनाथ जाधव करत आहेत.












