प्रतिनिधी / धाराशिव
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ सचिन देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली असून, सचिवपदी डॉ.मिलींद पौळ यांची निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल दोघांचेही अभिनंदन केले जात आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड झाली. त्यात अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख,सचिव डॉ. मिलिंद पोळ,उपाध्यक्ष डॉ महेश कानडे,कोषाध्यक्ष डॉ.नितीन भोसले तर कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.स्मिता शहापूरकर, डॉ. सुजीतकुमार रणदिवे,डॉ श्रद्धा मुळे,डॉ अनिल चव्हाण, डॉ.श्रीनिवास हंबीरे,डॉ कैलास गिलबिले,डॉ विशाल वडगावकर क्रीडा व सांस्कृतिक सचिव डॉ.सुशील चव्हाण यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.निवडणूक अधिकारी म्हणून डॉ.सुरेश करंजकर यांनी कार्य केले.