पालकमंत्री प्रा.डाॅ. तानाजीराव सावंत यांचे मत,हसेगावमध्ये विकास कामाचे भूमिपूजन
प्रतिनिधी / कळंब
तालुक्यातील हासेगाव (के) येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व सिमेंट रस्त्याचे लोकार्पण तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण म्हणून उभारण्यात येणाऱ्या स्मृतिस्तंभाचे अनावरण पालकमंत्री डाॅ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गावाच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायला हवे. मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायला हवे.
ते म्हणाले, स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा स्वातंत्र्य करण्यासाठी आपले घरदार सोडून जिवाची पर्वा न करता लढा दिला. त्यामुळेच आपण सुखाचे दिवस पाहत आहोत.पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते हसेगाव (के) येथील कोनशिला अनावरण, सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी विकासकामासाठी काही अडचण निर्माण होऊ देणार नाही, असे आश्वासन विलास पाटील यांना दिले. भविष्यात विलास पाटील यांना राजकीय वाटचालीत मोठी जबाबदारी मिळेल, असे संकेत यावेळी दिसून आले.यामुळे विलास पाटील यांना येणाऱ्या काळात शिवसेनेत काम करण्यासाठी मोठी संधी मिळणार अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.
डॉ. सावंत म्हणाले, हसेगाव स्वातंत्र्य सैनिकांचे गाव आहे.
गेल्या पंचेचाळीस वर्षापासून लोकांनी आंधळे प्रेम करत लोकप्रतिनिधी निवडून दिले. आणि लोकप्रतिनिधींनी याचा गैरफायदा घेतला. आता जनतेने यांना जाब विचारला पाहिजे. निवडून आल्यापासून पुढील निवडणूक लागेपर्यंत लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे. अन्यथा निष्क्रिय लोकप्रतिनिधींना जनतेने घरी बसविले पाहिजे.मी माझ्या मंत्रिपदाचा व आमदारकीच्या काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊनच जनतेत जाणार असल्याचे सांगितले.यावेळी व्यासपीठाव
र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
धनंजय सावंत,भैरवनाथ कारखान्याचे संचालक केशव सावंत, जिल्हाप्रमुख
दत्ता साळुंके,
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कार्यक्रमाचे संयोजक विलास पाटील, प्रा.गौतम लटके,महीला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा सागर मुंडे, विधानसभा संघटक अमोल पाटील, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, शिवसेना कळंब शहरप्रमुख गजानन चोंदे, शकील काझी
ऍड.मंदार मुळीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार परमेश्वर पालकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्रेश्वर खरडकर,प्रविण यादव, उमेश धुमाळ, राजाभाऊ चवरे, राजाभाऊ लोमटे दत्ता हंडीबाग आदींनी पुढाकार घेतला.