आरंभ मराठी / धाराशिव
घरफोडीच्या गुन्ह्यातील सऱ्हाईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या गुन्हेगाराला धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिताफीने अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. त्यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील गुरनं 346/2025 कलम 331 (4), 305 भा.न्या.सं. मधील आरोपी परसु लक्ष्मण चव्हाण (रा. जुना बसडेपो पाठीमागे, पारधी पिढी धाराशिव) हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तेथे जावून त्याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीचा गुन्हा हा त्याचा चुलता दत्ता बाबु चव्हाण आणि त्याने केल्याचे कबूल केले.पोलिसांना त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळुन आले.
त्याचेकडे त्याबाबत विचारपुस केली असता, त्याने ते सोन्याचे दागिने चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातुन दोन तोळे आठ ग्रॅम (28 (ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 2,52,000 रुपये किंमतीचे जप्त केले. तसेच आरोपीला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना (अतिरिक्त पदभार पोलीस अधिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, आयकर युनिट चे सपोनि सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, पोलीस हवालदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर यांच्या पथकाने केली.