आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील एका गावात एका वीस वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला मारहाण करून बिल्डिंग वरून खाली पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी जखमी अवस्थेत बिल्डिंगवरून पडल्यामुळे तिच्या पाठीचा मणका मोडला असून तिचे ऑपरेशन करावे लागले आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील एका गावातील वीस वर्षीय मुलीवर मागील तीन वर्षांपासून म्हणजे एप्रिल 2022 पासून 13 एप्रिल 2025 पर्यंत त्याच गावातील एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. आरोपी तरुणाने तरुणीवर अत्याचार करून तिला लाथाबुक्यांनी प्रचंड मारहाण केली.
मारहाण करत असताना पीडित तरुणी बिल्डींगवरुन खाली पडल्याने तिच्या पाठीच्या मणक्याचे हाड मोडून तिचे ऑपरेशन करावे लागले. यासंबधी पिडीत तरुणीने 9 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 115(2) कायदा अन्वये आरोपी तरुणावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.