आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील एका गावातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, एका गावातील 13 वर्षीय मुलीवर (नाव व गाव गोपनीय) दिनांक 29 एप्रिल 2025 ते 16 जून 2025 या दरम्यान गावातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.
दिनांक 16 जून रोजी त्याच अल्पवयीन मुलीवर गावातील दुसऱ्या दोन तरुणांनी तिला बुलेटवर बसवून शेजारच्या गावातील रोडलगत असलेल्या पत्र्याच्या शेडवर नेऊन दोघांनीही तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.
तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला व तुझे वडील व चुलते यांना जिवे ठार मारण्याची धमकी त्यांनी मुलीला दिली. पिडीत अल्पवयीन मुलीने दिनांक 23 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तीन आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम-64, 64(2), (एम), (आय), 65(1),70(1), 351 (2),(3),3(5) सह पोक्सो कलम 4,5(जी),(एल),6, 8 अन्वये ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.