आरंभ मराठी / आंबी
सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून जमावाने तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील एका गावात घडली. यावेळी मुलीची आई मदतीला आली असता तिलाही जमावाने मारहाण केली.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,
भूम तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) ही दिनांक 15 जुलै रोजी रात्री एक वाजता घरा समोरील अंगणात झोपली होती.
त्यावेळी गावातील चार ते पाच तरुण त्याठिकाणी आले आणि तिला घरापासून काही अंतरावर घेवून गेले. त्यातील एका तरुणाने मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर बळजबरीने लैंगीक अत्याचार केला. तसेच इतर तरुण तिला लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना तिने आरडा ओरड केली.
मुलीचा आवाज ऐकून तिची आई तिला वाचवण्यासाठी आली. त्यावेळी आईलाही तरुणांनी मारहाण करुन जखमी केले. पिडीत तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 115(2), 191(2) (3),190 सह कलम 4, 8, 12 पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.