आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी आज (२ डिसेंबर) सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरूवात झाली. पहिल्या चार तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी 22.81 टक्के मतदानाची नोंद झाली असून, दुपारी तीननंतर मतदानाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील नगरपालिकांमधील मतदानाचे प्रमाण पुढीलप्रमाणे :
धाराशिव नगरपालिका – 18%
तुळजापूर – 30%
नळदुर्ग – 23.50%
उमरगा – 23%
मुरूम – 29%
कळंब – 22.56%
भूम – 30%
परंडा – 23.76%
जिल्हाभरात एकूण 22.81% मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकूण 2 लाख 43 हजार मतदारांपैकी आतापर्यंत 55,574 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदार – 30,723 आणि महिला मतदार – 24,848 यांनी मतदान केले आहे.
पहिल्या दोन तासांत अनेक मतदान केंद्रांवर चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. मात्र सकाळी 11 नंतर मतदानाचा वेग मंदावल्याचे निरीक्षणात आले. दुपारच्या वेळेत मतदार बाहेर पडण्याचे प्रमाण घटले असले, तरी दुपारी तीननंतर पुन्हा मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडतील, असा अंदाज आहे.
नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत आणि सुरळीत मतदानाची प्रक्रिया सुरू असून प्रशासन आणि पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.









