• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, March 3, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

१२,५७५ सामायिक खातेदारांना अखेर मिळाला न्याय; पिक विमा कंपनीची मनमानी मोडीत

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 15, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
912
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

‘आरंभ मराठी’ च्या पाठपुराव्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा पीक विमा वाचला

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील तब्बल १२ हजारांहून अधिक सामायिक खातेदार शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला असून, दैनिक ‘आरंभ मराठी’ च्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे पीक विमा कंपनीला माघार घ्यावी लागली आहे. खरीप २०२५ हंगामातील पीक विम्याचे अर्ज अचानक रद्द करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने अखेर निर्णय बदलत सर्व अर्ज वैध ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सामायिक खातेदारांना न्याय मिळाला असून, सामायिक खातेदारांकडून तसेच सीएससी चालकांकडून दैनिक आरंभ मराठीचे आभार मानण्यात येत आहेत.

आयसीआयसीआय लोम्बार्ड पीक विमा कंपनीने नोव्हेंबर २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील १२,५७५ सामायिक खातेदारांचे पीक विमा अर्ज अचानक बाद केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या अन्यायकारक निर्णयावर दैनिक ‘आरंभ मराठी’ ने दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी ‘सामायिक खातेदारांवर पीक विमा कंपनीकडून अन्याय’ असे वृत्त प्रकाशित करून प्रकरणाला वाचा फोडली होती.

या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पीक विमा कंपनीला कायदेशीर कारवाईचा इशारा देत सामायिक खातेदारांचे अर्ज रद्द न करता वैध ठरवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. दिनांक २२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीतही विमा कंपनीला तशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही तब्बल पंधरा दिवस कंपनीकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पीक विमा कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात आरंभ मराठीने पुन्हा आक्रमक भूमिका घेत दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी ‘विमा कंपनीची मनमानी सुरूच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही सामायिक खातेदारांचा निर्णय नाहीच’
या मथळ्याखाली ठळक बातमी प्रसिद्ध केली होती.

या वृत्ताचा तात्काळ परिणाम होत दुसऱ्याच दिवशी, दिनांक १२ जानेवारी रोजी आयसीआयसीआय लोम्बार्ड पीक विमा कंपनीने रद्द केलेले सर्व १२,५७५ अर्ज वैध ठरवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची अधिकृत सूचना कंपनीकडून सर्व सीएससी केंद्र चालकांना देण्यात आली आहे. अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करून हे सर्व अर्ज अंतिमतः वैध करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

दैनिक आरंभ मराठीच्या निर्भीड पत्रकारितेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज वैध ठरल्यानंतर सामायिक खातेदार शेतकरी तसेच सीएससी चालकांकडून आरंभ मराठीचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Dharashiv#Jointaccount#Break#pickinsurance#company#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून ‘गोड’ भेट

Next Post

आणखी एका काका-पुतण्यामध्ये दरी, आमदार डॉ. तानाजी सावंत यांना धनंजय सावंतांकडून शह, सोनारीच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांसोबत बैठक, लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Related Posts

सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप-शिवसेना महायुतीकडून सत्तास्थापनेला गती ; मुंबईत भेटीगाठी वाढल्या

February 28, 2026

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

February 28, 2026

गावठी कट्टा व बुलेटसह तरुण ताब्यात; २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 28, 2026

मध्य प्रदेशातील भाविकांच्या वाहनाला अपघात, महामार्गावरील चुकीच्या कामामुळे दुर्घटना

February 28, 2026

टेलीग्रामवर जॉबची ऑफर देऊन बापलेकाची साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक

February 27, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड ‘या’ दिवशी होणार, कार्यक्रम जाहीर

February 26, 2026
Next Post

आणखी एका काका-पुतण्यामध्ये दरी, आमदार डॉ. तानाजी सावंत यांना धनंजय सावंतांकडून शह, सोनारीच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांसोबत बैठक, लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मित्राच्या घरात चोरी करणाऱ्या तीन मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

ताज्या घडामोडी

सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप-शिवसेना महायुतीकडून सत्तास्थापनेला गती ; मुंबईत भेटीगाठी वाढल्या

February 28, 2026

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

February 28, 2026

गावठी कट्टा व बुलेटसह तरुण ताब्यात; २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group