आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिवचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कीर्ती किरण पुजार हे 2017 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 2017 मध्ये 115 वी रँक मिळवली होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले आहे. जिल्हाधिकारी म्हणून धाराशिव जिल्ह्यात त्यांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांची बदली सोलापूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून केल्यानंतर गेला आठवडाभर धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. अखेर आज राज्य सरकारने कीर्ती किरण पुजार यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना तात्काळ जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. उद्या किंवा परवा ते धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होऊ शकतात.