आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांचा पदग्रहण समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. नगरपालिका सभागृहात आज सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासह एकूण २२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर नेहा राहुल काकडे आज अधिकृतपणे धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदाबाबत भाजपाकडून अद्याप निर्णय न झाल्याने आज उपनगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा होणार नाही. या पदग्रहण समारंभाला भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
आज तुळजापूर नगरपालिकेचाही पदग्रहण सोहळा असल्यामुळे आमदार राणा पाटील हे दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सध्या नगरपालिका सभागृहात पदग्रहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, नवनियुक्त नगरसेवक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.









