आरंभ मराठी / भूम
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करून महिलेचे तब्बल पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही आरोपीने लंपास केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील एका गावात घडली.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, भूम तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय महिलेवर 24 नोव्हेंबर 2017 पासून 22 जुलै 2025 पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने आठ वर्षे लैंगिक अत्याचार केला.
या काळात ती महिला घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जावून तिच्यावर बळजबरीने लैंगीक अत्याचार केला.
तसेच आरोपी तरुणाने आय. टी. आय. भुम येथे घेतलेल्या जमीनीत तुला हिस्सा देतो असे म्हणून पीडित महिलेकडून विश्वासाने 5 लाख 19 हजार 370 रुपये किंमतीचे 149 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेवून तिला ते परत न करता तिची फसवणुक केली.
पिडीत तरुणीने दिनांक 27 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-69, 318(2) अन्वये आरोपी तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.